Monday , September 21 2026
Breaking News

हुतात्म्याचे वारसदार शट्टूपा चव्हाण यांचे निधन

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगुंदी येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते शट्टूपा भावकू चव्हाण (वय ४०) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सकाळी 11 वाजता बेळगुंदी येथे होणार आहे. 1986 सालच्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात बळी गेलेल्या भावकू चव्हाण यांचे ते चिरंजीव होते.

ते बेळगुंदी येथील ग्रामस्थ कमिटीचे माजी अध्यक्ष होते. तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व लढ्यांमध्ये सहभागी होणारे सक्रिय कार्यकर्ते होते. बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या संयोजन समितीचे सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे बेळगुंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *