Thursday , December 18 2025
Breaking News

LOCAL NEWS

सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी दहा कोटीचा विकास निधी जाहीर

  मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मकरसंक्रांतीची भेट बंगळूर : मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना बंपर भेट दिली आहे. आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे विकास अनुदान जाहीर केले आहे. गेल्या वर्षी बेळगाव येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांना अनुदान वाटप न केल्याबद्दल भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री …

Read More »

विधिमंडळ बैठकीत पक्षांतर्गत गटबाजी उघड; जारकीहोळी-हेब्बाळकर यांच्यात बाचाबाची

  बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील नाराजीचा स्फोट झाला आणि प्रदेश काँग्रेसमध्ये सर्व कांही ठीक नाही हे पुन्हा एकदा समोर आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील दुफळीचे राजकारण सुरवातीपासूनच धुमसत आहे. दोघेही आपापल्या अनुयायांना किंवा समर्थकांना …

Read More »

महिला आघाडीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

    बेळगाव : महिला आघाडीतर्फे आज राजमाता जिजाऊ जयंती महिला आघाडीच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रेणू किल्लेकर यांनी जिजाऊंच्या कार्याचा …

Read More »

शहर म. ए. समितीची उद्या बैठक

    बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक यांनी उपस्थित रहावे, अशी विनंती शहर महाराष्ट्र एकीकरण समिती …

Read More »

शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिप्रेरणा कार्यक्रम संपन्न

    येळ्ळूर : येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव दक्षिण व गटशिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव ग्रामीण यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी विद्यार्थ्याकरिता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी होते. प्रेरणा कार्यशाळेत परिसरातील विविध शाळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. …

Read More »

युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक १५ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे भारतीय सैन्य दलामध्ये नव्याने रुजू झालेल्या तरुण, तरुणींचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी या सत्कार समारंभाला बेळगाव …

Read More »

जावयाने केली सासूची निर्घृण हत्या; वडगाव येथील घटना

  बेळगाव : मकर संक्रांती दिवशी मुलीला भेटण्यासाठी आलेल्या सासूची जावयाने निर्घृण हत्या केल्याची घटना खासबाग येथील रयत गल्लीत घडली. ४३ वर्षीय रेणुका पदमुखी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आणि रेणुका यांचा विवाह सात महिन्यांपूर्वी झाला होता. आरोपीची पत्नी तीन दिवसांपासून आजारी होती. मात्र, …

Read More »

विजयपूरच्या “त्या” ४ चिमुकल्या मुलांना बापानेच फेकले कालव्यात..

  विजयपूर : कौटुंबिक वादातून एका आईने आपल्या चार मुलांसह कालव्यात उडी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील बेनाळजवळील अलमट्टी येथे “एका आईने आपल्या मुलांसह डाव्या कालव्यात उडी घेऊन घेतली जलसमाधी” या शीर्षकाखाली विविध माध्यमांतून प्रसारित झालेल्या या बातमीने संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली होती. …

Read More »

उद्या श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात पालखीनिमित्त विविध कार्यक्रम

    बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून दिनांक 13 रोजी दाखल झाले असून विविध ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. महाद्वार रोडला विशेष कार्यक्रम महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात

  बेळगाव : कर्नाटकच्या महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज पहाटे 6 वाजता त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातामुळे त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात …

Read More »