Sunday , September 20 2026
Breaking News

महिला आघाडीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

Spread the love

 

 

बेळगाव : महिला आघाडीतर्फे आज राजमाता जिजाऊ जयंती महिला आघाडीच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रेणू किल्लेकर यांनी जिजाऊंच्या कार्याचा आढावा घेत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रिया कुडची, कांचन भातकांडे, अनुपमा कोकणे, आशा पाटील, कांचन यळ्ळूरकर, आशा सुपली, भाग्यश्री जाधव, शामिनी पाटील, अर्चना कावळे,  राजश्री बांबुळकर, माला जाधव यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *