Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

कर थकीत असलेल्या दुकानांना महापालिकेने ठोकले टाळे!

बेळगाव : बेळगाव महापालिकेचे अधिकारी आज सकाळीच सक्रिय झाले असून, शहरात कर न भरलेल्या दुकानदारांविरुद्ध आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरवात केली आहे. आज सकाळी बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या दत्त वडाप सेंटर, सलगर अमृत …

Read More »

शाळा-महाविद्यालयांत राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य

  बेळगावसह दहा शहरांत संविधान प्रास्ताविकेची प्रतिकृती बंगळूर : राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, राज्यघटनेबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने राजधानी बंगळुर, बेळगावसह राज्यातील दहा प्रमुख उद्यानांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला …

Read More »

कोणत्याही दबावाला भीक न घालता महामेळावा यशस्वी करू; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावासियांच्यावतीने महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे मंगळवार दिनांक २६ रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर …

Read More »

लोकसाहित्य – लोककला आणि संस्कृती रुजवणे व टिकवणे अत्यंत काळाची गरज

  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा नाईक यांचे प्रतिपादन बेळगाव : एंजल फाउंडेशन आणि डी मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर स्पर्धा आणि पारंपारिक वैयक्तिक फॅशन शो, आणि मंगळागौर ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन संयुक्त कार्यक्रम बनशंकरी मंदिर भडकल गल्ली बेळगाव येथील सभागृहात कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा एंजल फाउंडेशनच्या …

Read More »

मुडा प्रकरण : उच्च न्यायालयाने सुनावणी १० डिसेंबरपर्यंत केली स्थगित

  तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची याचिका बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) भूखंड वाटप घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने मंगळवारी तहकूब केली. आता ती १० डिसेंबरला होणार आहे. या प्रकरणातील लोकायुक्त तपासाच्या विश्वासार्हतेवर शंका घेत सामाजिक कार्यकर्ते स्नेहमई कृष्णा यांनी उच्च न्यायालयात याचिका …

Read More »

धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेमधून येळ्ळूर येथे वात्सल्य घराचे हस्तांतर

  येळ्ळूर : श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेच्या ज्ञान विकास कार्यक्रमांतर्गत, महात्मा फुले गल्ली, येळ्ळूर येथील श्रीमती जनाबाई हुवान्नावर यांना वात्सल्य घर बांधण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीमधून त्यांचे घर पूर्ण झाले असून, त्या वात्सल्य घराचा आज हस्तांतर कार्यक्रम धर्मस्थळ संस्थेचे जिल्हा निर्देशक सतीश नाईक …

Read More »

दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या बेळगाव शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित

  बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात ठिकठिकाणी दिनांक 27 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा नगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्र नगर, तिसरा रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, …

Read More »

जाएंट्स परिवाराचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांचे निधन

  बेळगाव – शहापूर सरस्वती रोड येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारचे माजी अध्यक्ष राजू माळवदे (वय 59) यांचे आज मंगळवार दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने धारवाड येथे निधन झाले. राजू माळवदे हे आज धारवाड उच्च न्यायालय खंडपीठाच्या कामकाजासाठी धारवाडला गेले होते. दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने साक्षरता जनजागृती

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने मराठी प्राथमिक शाळा मन्नूर येथे साक्षरता जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हातात साक्षरतेचे फलक घेऊन जनजागृती रॅलीने सुरुवात केली आणि शिवाजी चौकात रॅलीची सांगता झाली. आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा Rtn. रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि साक्षरता जागृती मोहिमेचा …

Read More »

राज्यातील ९३ सरकारी शाळात इंग्रजी माध्यम सुरू करण्यास मान्यता

  बंगळूर : पालकांच्या मागणीनंतर, राज्य सरकारने ९३ कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएसईएस) इंग्रजी माध्यमाचे विभाग सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. या अतिरिक्त विभागांसाठीचा खर्च २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या शाळांच्या विकासासाठी राखून ठेवलेल्या अनुदानातून केला जाईल. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (डीएसईएल) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या शाळांमध्ये २०२५-२६ पासून …

Read More »