Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; वाटाळ नागराजने ओकली गरळ!

    बेळगाव : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी, अशी गरळ कन्नड चळवळीचे प्रमुख वाटाळ नागराज यांनी ओकली आहे. बऱ्याच वर्षानंतर बेळगावात आलेल्या वाटाळ नागराज यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधातील आपली गरळ ओकून दाखवली. आम्ही सातत्याने म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी करतो. मात्र, …

Read More »

चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली; 15 जण किरकोळ जखमी

    बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अरवळ्ळी गावाजवळ बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. परिवहन मंडळाची बस एनगी गावातून बैलहोंगल लिंगदळ्ळी मार्गे जात असताना अरवळ्ळीजवळ उलटली. बसमधील सुमारे 10 ते 15 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अरवळ्ळी ग्रामस्थ व 108 रुग्णवाहिकेच्या सहकार्याने बैलहोंगल येथील शासकीय रुग्णालयात …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन येथे चॅम्पियन्स ट्रॉफी फत्ते केलेल्या भारतीय संघाचा कौतुक सोहळा दिमाखदार करण्यात आला. कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, याला भारतीय फिरकीपटूंची मिळालेली उत्तम साथ या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलँडला नमवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांनी नाशिक ढोलच्या गजरात टीम इंडियाचे कौतुक केले. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या …

Read More »

स्वतःच्या कवितेवर कवीने निष्ठा ठेवली पाहिजे : वैशाली माळी

  शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन बहारदार रंगले :मराठी भाषा गौरव दिवस आणि महिला दिनानिमित्त आयोजन बेळगाव : मराठी कवितेतल्या कवींची जी नावे घेतो त्यांनी खूप चांगलं काहीतरी लिहून ठेवलं आहे. जर आपण आपल्या कवितेवर निष्ठा ठेवली तर पुढल्या पिढीला आजची नावे मिळतील. ही निष्ठा म्हणजे आपण …

Read More »

शाॅपिंग उत्सव, ईव्ही ऑटो व फर्निचर प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, गुंतवणूक व विमा प्रदर्शनाचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मराठा मंदिर येथे शुक्रवार दि. 7 ते मंगळवार दि. 11 मार्च दरम्यान 5 दिवस आयोजित केले असून एकाच छताखाली 75 स्टॉल मधून सुमारे 10 हजार …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शन व विक्री कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या उपक्रमांतर्गत मुलांना सेंद्रिय पदार्थांची ओळख व्हावी, सेंद्रिय शेतीबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी शाळेत सेंद्रिय पदार्थ प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून …

Read More »

नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

  येळ्ळूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 127 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. टी. वाय. भोगण सर यांच्या शुभहस्ते झाले. तदनंतर समाज विज्ञान विषयतज्ञ श्री. एम. पी. कंग्राळकर यांनी …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात

    बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ शनिवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बेळगावमधील तीन कर्तबगार महिला डॉ. माधुरी हेब्बाळकर, नाट्यकर्मी पद्मा कुलकर्णी व प्राचार्या नीशा राजेंद्रन यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. …

Read More »

पर्यटन स्थळांवर पोलिस सुरक्षा कडक करणार : मंत्री परमेश्वर

  इस्रायली महिलेसह दोघींवर झालेल्या अत्याचाराची दखल बंगळूर : कोप्पळमध्ये एका इस्रायली महिलेसह आणखी एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने राज्यात खळबळ उडाल्यानंतर राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्यातील पर्यटन स्थळांवर पोलिस सुरक्षा कडक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हटले आहे. राज्यात जर काही अनधिकृत होमस्टे असतील तर …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये प्रेरणादायी महिलांचा सन्मान…

  बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तीन प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि सत्कारमूर्ती महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अनिषा सुळेभावी यांच्या प्रार्थनागीताने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत एचआर प्रमुख कावेरी लमाणी …

Read More »