Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावचे डायव्हिंगपटू मयुरेश जाधव, युवराज मोहनगेकर यांना सुवर्ण

  बेळगाव : नुकत्याच चेन्नई येथील वेल्हाचेरी जलतरण तलावात “35 व्या साउथझोन अक्वेटिक डायव्हिंग चॅम्पियनशिप मध्ये कर्नाटक चॅम्पियन” स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत साउथ झोन डायविंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या डायव्हिंगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना कर्नाटकाला चॅम्पियनशिप मिळवून दिली. कुमार मयुरेश जाधव ग्रुप 1 याने 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्ण तर 3 …

Read More »

रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञातांकडून गोळीबार; चालत्या कारवर झाडल्या गोळ्या

  बेळगाव : बेळगावात एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी गणेशपूरच्या हद्दीत घडली. बेळगावच्या शाहुनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक प्रफुल्ल पाटील याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. बेळगुंदी गावातून कारमधून जात असताना गणेशपूर येथील हिंदुनगर रोडवर हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने या गोळीबारात कारच्या काचा फुटल्या असून, जखमीला …

Read More »

या वर्षीचा रोटरीचा “उत्तम व्यावसायिक अभियंता” पुरस्कार श्री. आर. एम. चौगुले यांना बहाल!

  बेळगाव : कोणताही व्यवसाय करताना प्रामाणिकपणा व पारदर्शकपणा जपला तर तो अधिक वृद्धिंगत होतो हा सर्वसामान्य अनुभव आहे. याच व्यावसायिकतेच्या जोडीला समाज सेवेची किणार लाभली तर तो व्यवसाय समाजाभिमुख होतो आणि ही सामाजिक जाणीव अनेकांच्या आधाराचे केंद्र बनते! श्रीयुत आर. एम. चौगुले यांनी आजवर आपल्या व्यवसायात अनेक मानांकनं प्राप्त …

Read More »

“जय महाराष्ट्र”च्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी करवेची निदर्शने

  बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी “जय महाराष्ट्र”ची घोषणा देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच बेळगाव महानगरपालिका बरखास्त करावी या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. गुरुवारी शहरातील चन्नम्मा सर्कलमधून करवे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी बेळगाव महापालिकेवर मोर्चा काढून महापालिका बरखास्त …

Read More »

निम्हन्समध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी कार्यवाही करा : मुख्यमंत्र्यांची सूचना

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांना राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठात जमा झालेला अतिरिक्त निधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करून द्यावा आणि निम्हन्समध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवेतील अधिकारी भरतीसाठी पावले उचलण्याची सूचना केली. बेंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय कृष्णा येथे झालेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रगती …

Read More »

युवा मेळाव्याला पिरनवाडी भागातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार : नारायण मुचंडीकर

  बेळगाव : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी म्हणजेच 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका युवा आघाडी यांनी रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी “युवा मेळावा” आयोजित केला आहे. हा मेळावा १२ जानेवारी …

Read More »

निर्मितीकडून डॉ. शरद बाविस्कर यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न

  उचगाव : निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाजसेवा संस्था कुद्रेमानी यांच्या वतीने उचगाव विभागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही लक्षवेधी मुलाखत संस्थेच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉ. सरिता मोटराचे गुरव यांनी घेतली. …

Read More »

अबकारी खटल्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : पास व पर्मिट नसताना गोवा राज्यातील दारू व बिअर बॉटल ची सहाचाकी गुड वाहनातून विकण्यासाठी म्हणून घेऊन जाताना बेळगांव जांबोटी हायवे रोडवर पोलिस व इतर स्टाफ मिळून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असताना रंगे हात सापडलेल्या आरोपींची साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी येथील तिसरे जे. एम. एफ. …

Read More »

हुतात्मा दिनी “चलो कोल्हापूर”चा नारा; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : हुतात्मा दिनाच्या औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे “चलो कोल्हापूर”चा नारा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमाप्रश्नासंदर्भातील खटला, 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याबाबत त्याचप्रमाणे दिल्ली साहित्य संमेलन व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी मराठा …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

  बंगळूर : नक्षल कार्यकर्त्या मुंडगारू लता यांच्यासह चार महिला आणि दोन पुरुषांसह सहा नक्षल सैनिकांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. माओवादी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर राज्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना मुख्यमंत्र्यांचे गृह कार्यालय कृष्णा यांनी पाहिली आहे. बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मार्गावर जाण्याच्या इराद्याने मुंडगारू लता यांच्या नेतृत्वाखालील सहा …

Read More »