Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

दिव्यांग संघाकडून जमीन विक्रीचा प्रकार; संघाच्या माजी सदस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : वृद्धाश्रम उभारण्यासाठी खरेदी केलेली जमीन प्लॉटमध्ये रूपांतरित करून विक्री केली जात असल्याचा आरोप बेळगाव दिव्यांग संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकाराला दिव्यांग संघाच्या माजी सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगाव दिव्यांग संघाच्या वतीने वृद्धाश्रम उभारण्यासाठी विशेषतः जमीन खरेदी …

Read More »

सरकारी नोकरी व बढती मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा गैरवापर

  बेळगाव  : ओबीसी प्रवर्गातील काही जणांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या आणि बढती घेतल्याचा आरोप वाल्मिकी नायक समाजाने केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीने आंदोलन छेडत दोषींवर कारवाईची मागणी केली. वाल्मिकी नायक समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना सदर मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आले. समाजाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून हा …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ संघ श्री नरवीर तानाजी तालीम स्पोर्ट्स चषकाचा मानकरी

    बेळगाव : जुने बेळगाव येथील श्री नरवीर तानाजी तालीम स्पोर्ट्स चषक -2025 या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ संघाने हस्तगत केले आहे. सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस.आर.एस. हिंदुस्थान अर्थात श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी श्री गणेश स्पोर्ट्स वडगाव संघावर 6 गडी राखून …

Read More »

युवतीची निर्घृण हत्या करून प्रियकराची आत्महत्या….

  बेळगाव : शहापूर नाथ पै चौक शहापूर येथील एका घरात एका युवतीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची निर्घृण घटना आज संध्याकाळी घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, येळ्ळूर येथील प्रशांत कुंडेकर नामक तरूण हा नाथ पै चौक येथील ऐश्वर्या लोहार (वय १८) या युवतीवर प्रेम करत होता. सदर …

Read More »

संध्या कुलकर्णी यांना ‘अग्रेसर भारत तेजस्विनी संस्कृता पुरस्कार -2025’

  बेळगाव : अतिशय जुनी परंपरा असणारे महर्षी धोंडो केशव कर्वे स्थापित पुणे येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ व अग्रेसर भारत संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त येत्या शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी भारतातील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 21 महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना ‘अग्रेसर भारत तेजस्विनी संस्कृता पुरस्कार 2025’ पुरस्काराने सन्मानित …

Read More »

कारागृहातील मोबाईल जामर विरोधात हिंडलगा ग्रामस्थांचा रास्ता रोको

  बेळगाव : हिंडलगा परिसरातील जनजीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहातील मोबाईल जामरची वाढवलेली रेडियस क्षमता कमी करावी अशी वारंवार मागणी करून देखील कारागृह व्यवस्थापन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ हिंडलगा ग्रामपंचायतीचे नाराज पदाधिकारी, विविध संघटना आणि गावकरी यांच्यातर्फे कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर आज मंगळवारी सकाळी रास्ता रोको …

Read More »

घरकुल वृद्धाश्रमातर्फे बेळगाव ते प्रयागराज दुचाकी प्रवास अनुभवकथन

  बेनकनहळ्ळी स्थित घरकुल वृद्धाश्रम येथील श्री दत्त देवस्थानचे पुजारी श्री उल्हास अनंत जोशी हे नुकतेच आपल्या टीव्हीएस XL१०० दुचाकीवरून ४५०० किमी प्रवास करून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यास जाऊन आले. महाकुंभ येथे आलेले त्यांचे अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याचकडून ऐकण्यासाठी रविवारी सायंकाळी घरकुल वृद्धाश्रम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी घरकूलचे …

Read More »

राज्याच्या विकासाची गती, अधिक मजबूत आर्थिक स्थिती

  राज्यपाल गेहलोत; ‘हमी’मुळे आर्थिक व्यवस्था बिघडल्याच्या आरोपाला चोख उत्तर बंगळूर : हमी योजनांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील आर्थिक व्यवस्था बिघडली आहे, विकासाला धक्का बसला आहे, या विरोधकांच्या आरोपांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या माध्यमातून सरकारने चोख उत्तर दिले. राज्य सरकारच्या हमी योजनांमुळे राज्यातील विकासाला कोणताही धक्का बसला नाही. आर्थिक परिस्थिती बिघडलेली नाही, …

Read More »

राज्यपालांचे अधिकार केले कमी; भाजप-धजदचा राज्य सरकारविरुद्ध निषेध

  बंगळूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकार राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सोमवारी निदर्शने केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि त्यानंतर लगेचच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आमदारांच्या घरापासून विधानसभेपर्यंत निषेध मोर्चा काढला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि शिकारीपुराचे आमदार बी. वाय. विजयेंद्र, कर्नाटक …

Read More »

माझ्या अपहरणाशी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा काहीही संबंध नाही : व्यावसायिक अंबी यांचा खुलासा

  बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणाबाबत आता व्यापारी बसवराज अंबी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा माझ्या अपहरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील राजापूर गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझ्या अपहरणाशी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा काहीही संबंध …

Read More »