Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये मराठा सेंटरच्या कुस्तीपटूंचे यश

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या विश्वजित मोरे आणि धनराज जमनिक या कुस्तीपटूनी एशियन कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये आपली चमक दाखवली. हे दोघेही कुस्तीपटू मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. विश्वजित मोरे याने तेवीस वर्षाखालील गटात ग्रीको रोमन कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले. ही स्पर्धा …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूल येळ्ळूर येथे आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन

  बेळगाव : येळ्ळूर येथे दि. 16 जुलै आषाढी एकादशी निमित्त श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूलच्या वतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणातून दिंडीची सुरुवात झाली यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या रूपात विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, पुंडलिक, माऊली अशा विविध वेशभूषेत गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टाळ मृदंगाच्या साथीने …

Read More »

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

  बेळगाव : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे संस्थापक व जायंट्स मेन स्पेशल कमिटीचे सदस्य मोहन कारेकर यांनी ७० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या मित्रांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मंगळवार दि. १६ रोजी कारेकर यांच्या विनायकनगर येथील निवासस्थानी सर्व मित्रांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये प्रामुख्याने सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडीट …

Read More »

जीवाची पर्वा न करता स्वतः उतरून स्वच्छ केला नाला!

  बेळगाव : नानावाडी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथील मुख्य रस्त्याशेजारील नाल्यात सुशिक्षित आणि अशिक्षित अनाडी, मूर्ख आणि बेजबाबदा लोकांनी कचरा बांधून टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा व प्रशासनाचा बेशिस्त निष्काळजीपणा यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याची दखल आमचे जागरूक कार्यकर्ते …

Read More »

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली जिल्ह्यातील विविध नदीपात्रांची पाहणी

आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना बेळगाव : शेजारील महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील विविध भागांची पाहणी केली. सूतगट्टीजवळील घटप्रभा नदीच्या पुलाजवळ नदीच्या प्रवाहाचा वेग आणि सध्याची पाण्याची पातळी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. यानंतर त्यांनी संकेश्वर …

Read More »

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार मल्लिकार्जुन यांनी स्वीकारला

  बेळगाव : मल्लिकार्जुन यांनी मंगळवार दि. १६ रोजी जिल्ह्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारला. सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांची बागलकोट जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. विजयनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन यांची बेळगाव जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश सरकारने काढला होता. तत्कालीन सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी नवीन …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 येथे दिंडीचे आयोजन

  बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 होसुर, बेळगाव येथे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख, अध्यात्माची गोडी, संतांची शिकवण आणि भक्तिमार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी या दिंडीचे आयोजन …

Read More »

कर्नाटकात कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये १०० टक्के आरक्षण; सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला मंजुरी

  बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाने कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि गट ड पदांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत एका …

Read More »

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपीना जामीन

  बंगळूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आरोपी नवीन कुमार, अमित आणि एच. एल. सुरेश यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील पाचवा आरोपी अमित दिगवेकर ऊर्फ अमित ऊर्फ प्रदीप महाजन; सातवा …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांची राज्य भाजप महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती

  बेळगाव : बेळगाव येथील भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केलेल्या डॉ. सोनाली सरनोबत या सामाजिक बांधिलकी आणि समर्पणासाठी ओळखल्या जातात. डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात …

Read More »