Sunday , July 26 2026
Breaking News

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे संस्थापक व जायंट्स मेन स्पेशल कमिटीचे सदस्य मोहन कारेकर यांनी ७० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या मित्रांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मंगळवार दि. १६ रोजी कारेकर यांच्या विनायकनगर येथील निवासस्थानी सर्व मित्रांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये प्रामुख्याने सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे सर्व संचालक तसेच जायंट्स ग्रूप मेन या संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. ‘सुवर्णलक्ष्मी’चे संस्थापक सदस्य विजय सांबरेकर यांच्या हस्ते मोहन कारेकर यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
जाएंट्स ग्रूपच्यावतीने मदन बामणे, अविनाश पाटील, यल्लाप्पा पाटील यांनी कारेकर यांचा सत्कार केला. यावेळी मोहन कारेकर यांनी सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा मान्यवरांनी गौरव करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जायंट्स ग्रूपच्यावतीने मदन बामणे, अविनाश पाटील, यल्लाप्पा पाटील, मधु पाटील यांनी शुभेच्छापर भाषणे केली. सुवर्णलक्ष्मी सोसायटीच्यावतीने विजय सांबरेकर व विठ्ठल शिरोडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मोहन कारेकर यांच्या पत्नी मनीषा कारेकर, मुलगा चेतन मोहन कारेकर, मुलगी स्वाती कारेकर, नातू दिशांक चेतन कारेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *