Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

युवकांनी निष्ठेने काम करून प्रगतीची झेप घ्यावी

  बिपिन चिरमोरे; ‘मराठा संस्कृती संवर्धन’चा वर्धापनदिन उत्साहात बेळगाव : काम ही एक सेवाच असते. सेवा भावनेतून सातत्याने व प्रामाणिकपणे कार्य केल्यास कोणत्याही क्षेत्रात प्रगती साधने कठीण नाही. यासाठी मराठा समाजातील युवकांनी निष्ठेने काम करून सर्वांगीण क्षेत्रात प्रगतीची झेप घेतली पाहिजे, असे विचार पुणे येथील स्टॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ …

Read More »

जिजाऊ महिला मंडळ कंग्राळ गल्ली वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

  बेळगाव : येथील कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाचा 35 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ. चंद्रभागा सांबरेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका ज्योती मजुकर हजर होत्या. प्रारंभी श्रीमती अनिता शंभूचे यांनी प्रास्ताविक भाषण केले. प्रमुख पाहुण्या व पंचमंडळींच्या हस्ते दीपप्रज्वलन …

Read More »

बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेच्या रथ बांधणीचे काम प्रगतीपथावर

  बेळगाव : बिजगर्णी येथील महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने रथ बांधणीचे काम बिजगर्णी व कावळेवाडी गावातील सुतार कुटुंबियांनी स्वीकारलेली आहे. दोन्ही गावच्या बैठकीत सुतार कारागिरांना श्रीफळ, पानविडा देऊन काम आकर्षक करण्यासाठी सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मंडळाचे चेअरमन वसंत अष्टेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, यांच्या हस्ते स्वागत करण्यात …

Read More »

बेळगाव जिल्हा पालकमंत्र्यांची येळ्ळूर ग्राम पंचायतीला भेट

  बेळगाव : 10 मार्च 2024 रोजी बेळगांव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी येळ्ळूर ग्राम पंचायतीला भेट दिली. या भेटीदरम्यान महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. सर्वप्रथम ग्राम पंचायतच्या वतीने बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा शाल आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायतीतील वेगवेगळे उपक्रम तेथील शिस्त …

Read More »

हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचे बैलगाड्या, कुटुंबियांसह चन्नम्मा चौकात आंदोलन

  बेळगाव : बेळगावात हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी चन्नम्मा सर्कल येथे बैलगाडी घेऊन प्रचंड आंदोलन केले आणि पाटबंधारे विभागाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी गावातील शेतकऱ्यांनी हिडकल धरण आणि कर्नाटक पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात अनेकदा …

Read More »

डॉ. विनोद गायकवाड हे मातृस्मृती पुरस्काराने सन्मानित

  बेळगाव : येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्या “मिडल क्लास” या कादंबरीला कामेरी येथील कामेश्वरी साहित्य मंडळाचा ‘राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार’ नूकताच प्रदान करण्यात आला. संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांच्या हस्ते रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ यासह पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर …

Read More »

बॉम्बे मिठाईवर अखेर कर्नाटकात बंदी

  बेळगाव : लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या पण कॅन्सरला कारण ठरणाऱ्या बॉम्बे मिठाईवर अखेर कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी आज राज्यात रंगीत कॉटन कँडीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.विकाससौध येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, कलर कॉटन कँडीमध्ये (बॉम्बे …

Read More »

नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर अनिवार्य : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कन्नड भाषा समग्र विकास विधेयक-2022 च्या योग्य अंमलबजावणीबरोबरच प्रत्येक दुकानासमोरील नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी पावले उचलावीत, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी कन्नड भाषा समग्र विकास विधेयक-2022 ची अंमलबजावणी आणि नामफलकांवर कन्नड भाषेचा …

Read More »

समितीला तळागळात पोचविण्यासाठी वॉर्डनिहाय कार्यकारिणी करणे गरजेचे

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत विधानसभा मतदारसंघनिहाय उत्तर व दक्षिण विभागातील युवकांना प्राधान्य देण्यात आले असून यामध्ये जुन्याजाणत्या नेत्यांसोबत नव्या दमाच्या तरुण कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे. म. ए. समिती तळागाळात पोचविण्यासाठी नवीन कार्यकारिणी प्रयत्न करेल, अशी आशा समिती कार्यकर्ते व्यक्त …

Read More »

भीमा शंकर सहकारी बँक चोरी प्रकरणी 6 चोरट्यांना अटक

  विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील चडचण जवळील धुळखेड गावातील श्री भीमाशंकर सौहर्द सहकारी बँकेतून १९ लाख ५५ हजारांची रोकड घेऊन पळून गेलेल्या ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी दिली. आरोपींकडून २७ लाख १५ हजार रुपयांची ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. रविवारी …

Read More »