Monday , September 21 2026
Breaking News

भीमा शंकर सहकारी बँक चोरी प्रकरणी 6 चोरट्यांना अटक

Spread the love

 

विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील चडचण जवळील धुळखेड गावातील श्री भीमाशंकर सौहर्द सहकारी बँकेतून १९ लाख ५५ हजारांची रोकड घेऊन पळून गेलेल्या ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी दिली.

आरोपींकडून २७ लाख १५ हजार रुपयांची ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. रविवारी झलकी पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरोपींच्या अटकेसाठी इंडस्ट्रीज डीवायएसपी जगदीश एच एस यांच्या मार्गदर्शनाखाली चडचण सीपीआय एच डी मुल्ला आणि पीएसआय राघवेंद्र पोटा यांच्या देखरेखीखाली एक टीम तयार करण्यात आली होती आणि आरोपींना शोधण्यासाठी विस्तृत जाळे पसरवण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक महिंद्रा पिकअप, एक कार, एक दुचाकी आणि सहा मोबाईल जप्त करण्यात आले असून, उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला आहे. यावेळी तपास पथकात अप्पर पोलीस अधीक्षक शंकर मारिहाळ, प्रा. एस. पी. शालू, सीपीआय एच डी मुल्ला, पोलीस हवालदार व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *