बेळगांव : रविवार दिनांक 11/2/2024 रोजी श्री विश्वकर्मा सेवा संघ महिला मंडळाने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांची उस्फुर्त साथ मिळाली. उपस्थित मान्यवर मीनाताई बेनके आणि विश्वकर्मा समाजाच्या सावंत मॅडम या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मीनाताई बेनके …
Read More »LOCAL NEWS
संजय पाटील यांना लोकसभेचे तिकीट देण्याची मराठा समाजाची मागणी
बेळगाव : बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याने त्यांनाच यावेळच्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामीणमधील मराठा समाजाने केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मराठा समाजाची बैठक आज कॅम्पमधील गंगाधर शानभाग हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत माजी आमदार …
Read More »अतुल शिरोले यांना भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ‘अ’ श्रेणी प्राप्त
बेळगाव : बेळगाव येथील अतुल सुरेश शिरोले यांनी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणारा कोचिंग कोर्स पूर्ण केला असून त्यांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पैलवान म्हणून कुस्तीचे मैदान गाजवणारे अतुल शिरोले आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून मैदानावर उतरणार आहेत. पंजाबमधील पटीयाला येथे नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ …
Read More »रथसप्तमी निमित्त क्रीडा भारतीतर्फे सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलच्या मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही क्रीडा भारती बेळगाव व पतंजली योग शिबिर यांच्यातर्फे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता रथसप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्राथमिक व माध्यमिक शालेय मुले- मुली, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, योग वर्ग शारीरिक …
Read More »…म्हणे बेळगावमधील मराठी भाषिक कर्नाटकचेच!
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे परत महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंड सुख घेत कानडी लोकांची वाहवा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कर्नाटक प्रदेश काँगेस कमिटी कार्यालयाच्या समोर “समितीचे लोक सीमाभागातील मराठी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र हद्दीत कार्यालय सुरू करण्याची मागणी केली …
Read More »बेळगावात गांधीनगरातील भांडी दुकानात धाडसी चोरी
बेळगाव : बेळगावातील गांधीनगरातील राजवीर मेटल या भांडी दुकानात धाडसी चोरी करून सुमारे १५ लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. बेळगावात पुन्हा एकदा चोऱ्या-दरोड्यांचा सत्र सुरु झाले की काय अशी शंका यावी अशा घटना जोर धरू लागल्याहेत. राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या गांधीनगरातील राजवीर मेटल या भांडी …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाचा 10 मार्चला वधू-वर मेळावा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 10 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी …
Read More »अतिथी व्याख्यात्यांना कायम करण्याचा प्रस्ताव फेटाळला
बंगळूर : अतिथी व्याख्यात्याना (गेस्ट लेक्चरर्स) कायम करण्याची नियमात कोणतीही तरतूद नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. स्थायी अतिथी व्याख्यातांबाबत विधान मंडळाच्या अधिवेशनात चर्चा झाली. शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयांमध्ये १६ हजार अतिथी व्याख्यात्यांना कायम करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला आहे. विधान परिषद सदस्य ए. देवेगौडा यांनी नियम ७२ अन्वये अतिथी …
Read More »नामफलकावर कन्नड अनिवार्य: विधेयक विधानसभेत सादर
बंगळूर : राज्यातील दुकाने, उद्योग-व्यवसायांच्या नामफलकावर कन्नड अनिवार्य करण्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास (सुधारणा) विधेयक, २०२४ विधानसभेत सादर करण्यात आले. या संदर्भात जारी करण्यात आलेला अध्यादेश माघारी पाठवून विधिमंडळात विधेयक मंजूर करण्याची सूचना राज्यपालांनी केली होती. कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हे विधेयक …
Read More »जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे जाळे सक्रिय, सावध रहा : एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अनेक लोक दुप्पट पैशाच्या मोहात पडून लाखो रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी केले. बेळगावात आज पत्रकारांशी बोलताना एसपी भीमाशंकर गुळेद म्हणाले की, जिल्ह्यातील जनता दुप्पट पैशाच्या हव्यासात पडली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta