Sunday , July 26 2026
Breaking News

अतुल शिरोले यांना भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ‘अ’ श्रेणी प्राप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील अतुल सुरेश शिरोले यांनी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणारा कोचिंग कोर्स पूर्ण केला असून त्यांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पैलवान म्हणून कुस्तीचे मैदान गाजवणारे अतुल शिरोले आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून मैदानावर उतरणार आहेत.

पंजाबमधील पटीयाला येथे नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टमध्ये कुस्ती प्रशिक्षक पदासाठी डिप्लोमा कोर्स करणासाठी देशभरातील विविध भागांतून पैलवान उपस्थित होते. यामध्ये बेळगाव मधील मुचंडी गावचे सुपुत्र पैलवान अतुल शिरोले यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून ‘अ’ श्रेणी संपादन असून आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून ते मैदानावर उतरतील.
भारत सरकार क्रीडा मंत्रालयाच्या वतीने खेल प्राधिकरण मार्फत निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम घेण्यात येतो. यापूर्वी गेली १० वर्षे पै. अतुल शिरोले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळत होते. जॉर्जिया, रशिया, युरोप, तुर्कस्तान, दक्षिण कोरिया येथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी कांस्यपदक देखील पटकाविले आहे. जागतिक व आशियाई स्पर्धेमध्ये भारतच प्रतिनिधित्व करून पदक सुधा पटकाविले आहे या त्यांचं अतुलनीय कामगिरी साठी भारत सरकार कडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देण्यात आलेला आहे
या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे बेळगांव व ग्रामीण भागात कौतुक होत आहे. अतुल हा सद्या मराठा मंडळ संस्थेमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांना संस्थेच्या अध्यक्षांचे प्रोत्साहन तर मित्र परिवार व मुचंडी गावच्या गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *