Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावात हरे राम.. हरे कृष्णाचा जागर!

  उद्याही विविध कार्यक्रम बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या २६व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्याशी भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि चैतन्य सुंदर महाराज, मॉरिशस व वृंदावनदास महाराज यांच्या हस्ते रथाची …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी तर्फे 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिन मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी प्रबोधिनीचा हा रौप्य महोत्सवी मराठी भाषा दिन आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवर वक्त्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या …

Read More »

येळ्ळूरमध्ये उद्या 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : चार सत्रात आयोजन, पुरस्काराचेही वितरण

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन …

Read More »

ॲड. एस. एस. किवडसण्णावर सहाव्यांदा बार असोसिएशन अध्यक्षपदी

  बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी विजय मिळवला आहे. वकील संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत चाललेल्या मतमोजणीत ते सहाव्यांदा अध्यक्ष पदी विजयी झाले. बेळगाव बार असोसिएशनची 2024 ते 26 या काळासाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने पार पडली. बेळगाव बार असोसिशनच्या एकूण 11 जागांसाठी 37 जण …

Read More »

४० टक्के कमिशनचे पुरावे असल्यास आयोगाकडे सादर करा

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; ईश्वरप्पांच्या वादग्रस्त वक्तव्यावर इशारा बंगळूर : राज्यातील ४० टक्के कमिशनच्या आरोपावरून पुन्हा गदारोळ होत आहे. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केम्पण्णा यांनी मागील भाजप सरकारवर ४० टक्के कमिशनचा आरोप केला होता. आता त्यांनी काँग्रेस सरकारवरही असेच आरोप केले आहेत. मात्र मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी अशा आरोपाची कागदपत्रे किंवा पुरावे असल्यास …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील वसाहतीना पाणीपुरवठा प्रकल्पाना मंजूरी

  मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्येही आरक्षण बंगळूर : जलजीवन अभियानांतर्गत बेळगावमधील निवडक वस्त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ३७७ कोटी रुपये खर्चाचे दोन प्रकल्प राबविण्यास गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्री एच.के. पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील दड्डी व इतर ८१ गावे …

Read More »

अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन; ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपद भूषविणार

  स्वागताध्यक्ष : शिवसंत संजय मोरे बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित ‘5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024’ रविवार दि.18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण होते. यावेळी साहित्यिक निवड करण्याकरिता …

Read More »

युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठा मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व दिगंबर पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून व हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई व …

Read More »

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

  बेळगाव : कै. चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती बेळगाव यांच्या वतीने नवोदित पुरूष व महिला कुस्तीपटूंसाठी प्रोत्साहनार्थ रविवारी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आनंदवाडी आखाडा येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर स्पर्धा रविवारी दुपारी ठीक ३ वाजता मैदानाला सुरवात होणार आहे. या मैदानात पुरूष गटात …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये विविध कलांचे प्रदर्शन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे हस्तकला-चित्रकला, संगणक प्रकल्प व अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळामधील कलाशिक्षक श्री. गजानन गुंजटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, शाळा सुधारणा समितीचे सदस्य अरुण …

Read More »