Sunday , July 26 2026
Breaking News

अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन; ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपद भूषविणार

Spread the love

 

स्वागताध्यक्ष : शिवसंत संजय मोरे

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित ‘5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024’ रविवार दि.18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण होते.

यावेळी साहित्यिक निवड करण्याकरिता बैठक नुकतीच डी. बी. पाटील फोटो स्टुडिओत घेण्यात आली. हे संमेलन तीन सत्रांत संपन्न होणार आहे.

यावेळी 5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत. त्यांना सन् 2023 चा साहित्य अकादामीचा पुरस्कार मिळाला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिवसंत संजय मोरे असणार आहेत.

सदरहू हे संमेत्रन तिन सत्रांत होणार आहे. गोवावेस येथून ग्रंथदिंडी सुरुवात होईल. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात डॉ. सदानंद मोरे यांनी संपादित व दीर्घ प्रस्तावना असलेल्या ‘शिवराजाभिषेक : भारतातील इतिहासातील असामान्य घटना’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच गीतकर सीमाकवी रवींद्र पाटील आणि शरद गोरे यांनी संगीतबद्ध असलेले सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी स्वरबद्ध केलेले गीत ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ या ध्वनिमुद्रीत गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल.

पहिल्या सत्रांत – अध्यक्षीय भाषण, दुसरे सत्र – व्याख्यान ‘शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या विषयावर व्याख्याते – प्रा. गणेश राऊत यांचे व्याख्यान
आणि तिसऱ्या सत्रात – कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ प्रस्तूत ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. अशी माहिती राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.
यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, संजय मोरे, रणजित चौगुले, संजय गुरव, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर, एम. के. पाटील, संजय गौडाडकर तसचे महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे पाटील, रोशनी हुंदरे, सुनिता बडमंजी, स्मिता किल्लेकर, डॉ. संजिवनी खंडागळे, स्मिता मेंडके, नेत्रा मेणसे व गीता घाडी उपस्थित होत्या.

सदर साहित्य संमेलन लोकवर्गणी होत असून दरवर्षी सढळ हस्ते देणगी देणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र संपन्न होणार आहे. संमेलन यशस्वी करण्याकरीता परिषदेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *