Wednesday , April 22 2026
Breaking News

ॲड. एस. एस. किवडसण्णावर सहाव्यांदा बार असोसिएशन अध्यक्षपदी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी विजय मिळवला आहे. वकील संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत चाललेल्या मतमोजणीत ते सहाव्यांदा अध्यक्ष पदी विजयी झाले. बेळगाव बार असोसिएशनची 2024 ते 26 या काळासाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने पार पडली.

बेळगाव बार असोसिशनच्या एकूण 11 जागांसाठी 37 जण रिंगणात होते. दिवसभर मोठ्या चुरशीने वकिलांनी मतदान केले. बेळगाव बार असोसिएशनच्या एकूण 2017 पैकी 1631 सदस्यांनी मतदान केले जवळपास 62% वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळीच्या सत्रात मतमोजणी सुरू झाली त्यावेळी मोठ्या संख्येने वकिलांनी गर्दी केली होती

शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदी ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांना एकूण मते 1632 मते पडली त्यांनी 242 मतांच्या फरकाने बाजी मारली. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ॲड. सुधीर जैन, ॲड. एस. एस. किवडसण्णावर आणि सुनील सानिकोप्प असे तिघेजण रिंगणात होते.

उपाध्यक्षपदी बसवराज मुगळी यांची निवड झाली असून त्यांना 899 मते मिळाली. ॲड. शितल रामशेट्टी आणि ॲड. विवेक व्ही. पाटील यांना 421 इतकी समसमान मते मिळाल्यामुळे दोघांनाही एका एका वर्षासाठी विभागून हे पद देण्यात आले आहे.

जनरल सेक्रेटरीपदी वाय.के.दिवटे यांनी बाजी मारली. त्यांना 462 इतकी मते मिळाली.
जॉइंट सेक्रेटरी म्हणून विश्वनाथ सुलतानपुरे निवडून आले असून त्यांना 544 मते मिळाली. तर कमिटी सदस्य पदासाठी एकूण 13 जणांनी अर्ज केले होते. यापैकी सुमित अगजगी -873, ॲड. इराप्पा पुजार-699, विनायक निंगनूर-680, सुरेश नागगनुरे-670 आणि अनिल पाटील-680 या पाच जणांनी विजयी मिळवला आहे. महिला प्रतिनिधी म्हणून 488 मते मिळवत अश्विनी हवालदार यांनी विजय संपादन केला.

निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवारांना समर्थकांचा जल्लोष सुरु झाला होता.

जेएमएफसी न्यायालयातील वकील समुदाय भवन येथे पार पडलेल्या निवडणुकीनंतर सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतमोजणी हाती घेण्यात आली होती. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. आर. बी. मिरजकर यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *