Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी काउंटरसमोर तळ्याचे स्वरूप!

  बेळगाव : एकीकडे जिल्हा रुग्णालयाच्या सुधारणेसाठी होत असलेले प्रयत्न, जिल्हा रुग्णालयातील सुविधा, सोयी, उपचार पद्धती या सर्वच गोष्टींचा दर्जा सुधारण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात उद्भवणाऱ्या नेहमीच्याच समस्या यामुळे नागरिक जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नेहमीच ताशेरे ओढत असतात. आज येथील ओपीडी काउंटरसमोर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची …

Read More »

हलगा येथे दोन कंटेनरची समोरासमोर धडक; चार जखमी

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा येथे एक नियंत्रण सुटलेला कंटेनर दुभाजकावर चढून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिल्याने दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील अलारवाड ब्रिजजवळील ऑक्स वॅगन शोरूमजवळ गुरुवारी पहाटे एका कंटेनरचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिली. तसेच बंगळुरूहून …

Read More »

मारहाण प्रकरणातून माजी सैनिकाची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : महालक्ष्मीनगर, गणेशपूर येथे गेल्या एप्रिल महिन्यात घडलेल्या रिक्षा चालकाला मारहाण करण्याच्या प्रकरणातून बेळगावचे पाचवे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी साक्षीदारातील विसंगतीमुळे एका माजी सैनिकाची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या माजी सैनिकाचे नांव बळीराम भरमा सावंत (वय 48, रा. दुसरा क्रॉस, महालक्ष्मीनगर, …

Read More »

मराठा मंडळाचा शैक्षणिक उपक्रम दिन

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ ही शिक्षण संस्था आजवर नानाविध लोकाभिमुख उपक्रम राबवत आली आहे. संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष कै श्री नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांनी काटकसर करून संस्थेचा शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला. शिक्षण संस्था सर्वांगाणं वाढली पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बघता बघता या संस्थेचे रूपांतर शिक्षणाची अनेक …

Read More »

अस्वच्छतेमुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव; तातडीने औषध फवारणी करावी : मोहन मोरे

  बेळगाव : बिजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात औषध फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, विविध साथींचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने औषध फवारणी करण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली आहे. बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, व यळेबैल गाव परिसरात गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत …

Read More »

मुसळधार पावसामुळे बेळगावमधील ऐतिहासिक विहीर कोसळली

  बेळगाव : मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील ऐतिहासिक विहीर, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. हि विहीर अत्यंत जुनी असून चार घडघडे असणारी हि विहीर आजवर कधीच आटली नव्हती. संपूर्ण उन्हाळाभर या विहिरीतून पाणीपुरवठा व्हायचा. पण मुसळधार पावसामुळे अचानक हि विहीर कोसळली असून यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

मराठा सेवा संघ बेळगांवतर्फे ७ रोजी ‘माईंड पॉवर’वर परिसंवाद

  बेळगाव : मागील महिन्यात कोल्हापूर येथील प्रसिद्ध माईंड ट्रेनर आणि मोटिवेशन स्पीकर शिवश्री विनोद कुराडे यांचे बेळगाव शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन बेळगाव व येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याला मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या पालकांच्या आग्रहास्तव विनोद …

Read More »

इंगळी पीकेपीएस अध्यक्षपदी सुनील पाटोळे

  अंकली : इंगळीतील बहुद्देशीय प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी सुनील पाटोळे तर उपाध्यक्षपदी बिबाताई शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजाराम माने यांनी प्रास्तविक केले. संचालक मंडळ आणि संस्थेतर्फे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटोळे यांनी सर्वांच्या सहकायनि संघासह …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न

  अशोक, विजयेंद्रसह भाजप नेत्यांना अटक बंगळूर : मध्य बंगळुरमधील कुमार कृपा रोडवरील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अधिकृत निवासस्थानाला बुधवारी घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी राज्य भाजपचे प्रमुख बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह दहाहून अधिक जणांना ताब्यात घेतले. सत्ताधारी काँग्रेस सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप …

Read More »

जायन्टस ग्रुप ऑफ बेलगाम परिवारतर्फे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट भिडे यांचा सन्मान!

  बेळगाव : जायन्टस ग्रुप ऑफ बेलगाम परिवारतर्फे चार्टर्ड अकाउंटंट दिनाच्या निमित्त टिळकवाडी बेळगांव येथील प्रसिद्ध अकाउंटंट श्री. सुनील महादेव भिडे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य सुनील भिडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध चार्टड अकाउंटंट सुनील भिडे हे आपल्या चिरंजीव आदित्य भिडे यांना चार्टड अकाउंटंट बनवलं आहे तसेच बेळगावतील इतर तरुणांना …

Read More »