Sunday , July 26 2026
Breaking News

एसबीजी हाॅस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर

Spread the love

 

बेळगाव : एसबीजी आयुर्वेदिक हाॅस्पिटलच्यावतीने शनिवार दि. 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी टेकडी, गणेशपूर रोड येथील संस्थेच्या सुसज्जित रूग्णालयात हे आरोग्य शिबिर भरविण्यात येणार आहे.
मोफत रक्ततपासणी, हिमोग्लोबिन, मधूमेह, कॅल्शियमची कमतरता, थायराॅईड आदिंवर तपासणी करून उपचार करण्यात येतील. यामध्ये विशेष तज्ज्ञ डाॅक्टरांकडून संपूर्ण आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन तसेच उपचार करण्यात येणार आहेत. विशेषतः मोफत आंतररुग्ण चिकित्साही दिली जाणार आहे.
समस्त नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *