अथणी : माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी या मतदारसंघातील पारंपरिक मतांची माहिती घ्यावी. निवडणुकीत त्यांच्या चुकीमुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यानी पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करावी असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सतीश जारकीहोळी यांच्यावर केला. अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या लोकसभा …
Read More »LOCAL NEWS
मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी अभिजीत केळकर यांच्याकडून सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेला मदत
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले श्री. अभिजीत केळकर यांनी मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेला 50 हजार रुपयाची देणगी दिली.. अभिजीत केळकर हे सन 2005-06 यावर्षी शाळेचे माजी विद्यार्थी होते. हुषार, अभ्यासू, प्रामाणिक विद्यार्थी …
Read More »अर्भकाला विकण्याचा प्रयत्न; 5 जणांना अटक
बेळगाव : अवघ्या एक महिन्याच्या अर्भकाला विकण्याचा प्रयत्न मार्केट पोलिसांनी हाणून पाडला. यामध्ये डॉक्टर, कंपाऊंडरसह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्रेमसंबंधातून जन्मलेले परंतु प्रेमीयुगुलाला नको असलेले मूल डॉक्टर आणि कंपाऊंडर यांनी संगनमताने एका नर्सला अवघ्या 60 हजार रुपयांना …
Read More »कुख्यात दरोडेखोर विशालसिंग चौहान याला गुंडा ॲक्टखाली अटक
बेळगाव : कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र या राज्यात गुन्हेगारी कृत्ये करून पोलिसांपासून फरार झालेला कुख्यात दरोडेखोर विशालसिंग चौहान याला बेळगाव पोलिसांनी गुंडा ॲक्ट अतंर्गत अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी गुलबर्गा कारागृहात केली आहे. एक खून, पाच खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, दरोडा, अवैध शस्त्रांचा वापर अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो तीन राज्यांच्या …
Read More »मुसळधार पावसाचा अंदाज; बेळगावसह विविध ठिकाणी यलो अलर्ट जाहीर
बंगळुरू : राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तरा कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, बेळगाव, धारवाड, गदग आणि कोप्पळ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पावसामुळे हावेरी, शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट …
Read More »रायबागमध्ये कार उलटली : दोघांचा जागीच मृत्यू
बेळगाव : रायबाग तालुक्यातील हंदीगुंड गावाच्या हद्दीत चालकाचा कारवरील ताबा सुटून कार विजेच्या खांबाला धडकून कार उलटली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. रायबाग तालुक्यातील पलभावी गावातील महालिंग गुरुपद निंगनूर (४७) इराप्पा चन्नाबसू उगारे (३२) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले इमाम राजेसाब सनदी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर हारुगेरी …
Read More »१३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर घटप्रभा नदीत उलटला
बेळगाव : घटप्रभा नदी ओलांडताना १३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आवरादी गावात हा अपघात झाला. घटप्रभा नदी ओलांडत असताना ट्रॅक्टर नदीत उलटला. ट्रॅक्टरमध्ये १३ जण होते. त्यातील १२ जण सुदैवाने बचावले तर एक बेपत्ता आहे. १३ जण आवरादीहून नांदगावकडे ट्रॅक्टरने मजुरीसाठी जात होते. घटप्रभा …
Read More »कर्ले-बेळगुंदी रस्त्यावर धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण जागीच ठार
बेळगाव : कर्ले-बेळगुंदी रस्त्यावरील बेळगुंदी स्मशानभूमीजवळ धावत्या दुचाकीवर झाड कोसळून एक तरुण जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले आहेत. रविवारी (दि.९) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ रवळू मुचंडीकर (वय २०, रा. कर्ले) असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमनाथ व …
Read More »‘वाल्मिकी’ घोटाळा प्रकरणी कोणत्याही चौकशीला तयार
मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील; पुरावे नष्ट केल्याचा आरोप बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळ मंडळाचे पुरावे नष्ट करण्याबाबत कोणाशीही बैठक झाली असेल तर खुल्या व निष्पक्ष चौकशीसाठी तयार आहोत, असे खुले आव्हान वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी दिले आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाल्मिकी विकास महामंडळ प्रकरणात चौकशी होत …
Read More »उच्च न्यायालयाची एसआयटीला नोटीस
एच. डी. रेवण्णांची गुन्हा रद्द करण्याची मागणी बंगळूर : आमदार एच. डी. रेवण्णा यांनी हसन जिल्ह्यातील होळेनरसीपूर शहर ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाला (एसआयटी) नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या एकल सदस्यीय खंडपीठाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta