Monday , May 25 2026
Breaking News

सर्वपक्षीय बैठक घेऊनच हुतात्मा स्मारकाची निर्मिती

Spread the love

 

माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर‌; हुतात्मा शेतकऱ्यांना निपाणीत अभिवादन

निपाणी (वार्ता) : तंबाखू दराच्या आंदोलनात निपाणी परिसरातील बारा शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांचे निरंतर स्मरण व्हावे, यासाठी हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे. आता जागेचा प्रश्न मिटला असून सर्वांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घेऊनच हुतात्मा स्मारकाचे उभारणी करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी केले. येथील आंदोलन नगरातील हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित शेतकऱ्यांना अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते शामराव देसाई, सुजाता देसाई उपस्थित होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्मारकासह हुतात्मा शेतकऱ्यांच्या प्रतिमेची पूजन झाले. त्यानंतर नियोजित हुतात्मा स्मारकाच्या नामफलकाच्या अनावरण करण्यात आले.
शामराव देसाई यांनी, शेतकऱ्यांनी तंबाखू दरासाठी लढा दिल्यानेच सध्या चांगला दर मिळत आहे. त्यामुळे बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांचा विसर पडू देऊ नका. त्यांचा नावे स्मारक बनवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. उसापासून अनेक उपपदार्थ मिळत असल्याने प्रति टन ऊसाला ४ हजार ५०० रुपये दर मिळाव यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहून लढा दिला पाहिजे. याशिवाय इथेनॉल निर्मितीपासून मिळणारी रक्कम शेतकऱ्याला दिल्यास शेतकरी कर्जबाजारी होणार नसल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. अच्युत माने यांनी, हुतात्मा स्मारकाबाबत नगरसेवक नगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची याबाबत बैठक झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. यावेळी एस. के. पाटील, विठ्ठल वाघमोडे, अभय मानवी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, प्रा. एन. आय. खोत, माणिक पाटील, अस्लम शिकलगार, प्रा. नानासाहेब जामदार, अण्णासाहेब कुऱ्हाडे, प्रा.आनंद संकपाळ, बाबासाहेब मगदूम, बाबुराव मलाबादे,सुधाकर माने, टि. के. पाटील, विजय मेत्राणी, गणू गोसावी, विश्वनाथ जाधव, बचाराम सांडुगडे, यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *