Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

तानाजी गल्लीजवळील विहिरीत मृतदेह आढळला!

  बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातील तानाजी गल्ली रेल्वे फटका जवळील ब्रह्मलिंग मंदिरा शेजारील विहिरीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर विहिरीत मृतदेहाचे पाय तरंगत असतानाचे आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. नववर्षाच्या सुरवातीलाच ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सदर घटना आत्महत्या आहे की खून याबाबत मार्केट …

Read More »

बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे अध्यक्ष ऍड. बागेवाडी यांचा ‘नवहिंद’तर्फे सत्कार

  बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ची कार्यप्रणाली सर्व स्तरातील लोकांसाठी आशादायक आहे. क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सोसायटीने पतपुरवठा करून सर्वसामान्यांची ‘पत’ वाढवण्याची किमया ‘नवहिंद’ने केलेली आहे. ही संस्था माझ्या ‘आई’सारखी असून मी छ. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून कार्य करत राहीन, असे उदगार बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे नूतन अध्यक्ष जेष्ठ वकील …

Read More »

बेळगावातील कॉलेज रोडवर भीषण अपघातात युवक जागीच ठार

  बेळगाव : बेळगावातील कॉलेज रोडवर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला. कॉलेज रोडवर सरदार हायस्कूलच्या समोर आज सोमवारी पहाटे भरधाव मोटरसायकलवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पंकज नामक युवक रस्त्यावर उडून पडला. त्यामुळे …

Read More »

शिवकुमार “पर्सन ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित

  शिवशंकरप्पा, संतोष लाड, गोविंदराजू यांना विशेष पुरस्कार बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रेस क्लब ऑफ बंगळुरच्या “पर्सन ऑफ द इयर-स्पेशल पर्सन” आणि वार्षिक पुरस्कार समारंभाचे उद्घाटन केले आणि प्रेस क्लब डायरी २०२४ चे प्रकाशन केले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना “पर्सन ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी …

Read More »

शिवकुमारांच्या गुंतवणुकीचा तपशील द्या; जयहिंद वाहिनीला सीबीआयची नोटीस

  बंगळूर : सीबीआयने केरळस्थित जयहिंद वाहिनीला नोटीस बजावून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चॅनलमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील मागितला आहे. काँग्रेस नेत्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. एजन्सीची बंगळुर शाखा शिवकुमार यांच्या विरोधात खटल्याचा तपास करत आहे, त्यांनी जयहिंद कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना …

Read More »

जीवनविद्या मिशनच्या वतीने महारक्तदान शिबीर संपन्न

  बेळगाव : सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी गंगापुरी महाराज मठ, कोरे गल्ली शहापूर या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर श्री. माधव …

Read More »

विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहे साफ करण्यास सक्त मनाई

  विद्यार्थ्यांचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई बंगळूर : सरकारने राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल करण्यास सक्तीने बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी परिपत्रक काढून कडक सूचना दिल्या आहेत. आयुक्त बी. बी. कावेरी यांनी परिपत्रकात …

Read More »

राज्यात 2 जानेवारीपासून पुन्हा कोविड प्रतिबंधक लस

  बंगळूर : राज्यात कोविडचे जेएन १ उत्परिवर्तन वाढत असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सरकार दोन जानेवारीपासून राज्यात कॉर्बीवॅक्स लस देणार असल्याची माहिती उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही लस देण्यास सरकार तयार आहे. राज्यात कोविड संसर्गामुळे मृत्यू होत आहेत. राज्यात सावधगिरीचे लसीकरण …

Read More »

युवा समितीच्या वतीने उद्या निवेदन

  बेळगाव : कन्नड संघटना आणि कर्नाटक प्रशासनाने चालविलेल्या कन्नड फलक बळजबरी, मराठी फलकांच्या अवमानाविरुद्ध व दोन भाषिकामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. पोलीस आयुक्त बेळगाव व महानगर पालिका आयुक्त, बेळगाव यांना निवेदन देण्यात …

Read More »

कॅपिटल वन व्याख्यानमालेची दिमाखात सुरुवात

  बेळगांव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या एस.एस.एल.सी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती महाविद्यालयाचे निवृत प्राचार्य आर. के. पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन शाम सुतार, मराठी विषयाचे व्याख्याते ठळकवाडी हायस्कूलचे श्री. सी. …

Read More »