Wednesday , April 22 2026
Breaking News

तानाजी गल्लीजवळील विहिरीत मृतदेह आढळला!

Spread the love

 

बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातील तानाजी गल्ली रेल्वे फटका जवळील ब्रह्मलिंग मंदिरा शेजारील विहिरीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर विहिरीत मृतदेहाचे पाय तरंगत असतानाचे आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.

नववर्षाच्या सुरवातीलाच ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सदर घटना आत्महत्या आहे की खून याबाबत मार्केट पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळी रक्त सांडलेले असून नवीन वर्षाच्या स्वागतानंतर अज्ञातांनी खून करून मृतदेह विहिरीत टाकला आहे की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मार्केट पोलीस याबाबतचा तपास करीत आहेत. भरवस्तीत ही घटना घडल्यामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *