Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

तीन वर्षात २५० हून अधिक बालकांची विक्री

  तपासात माहिती समोर; सीसीबी पोलिसांकडून कसून चौकशी बंगळूर : बालक विक्री नेटवर्कच्या अटक केलेल्या आरोपींनी आतापर्यंत २५० हून अधिक मुलांची विक्री केल्याची धक्कादायक बाब सीसीबी पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. बालक विक्री नेटवर्कच्या आरोपींनी कर्नाटकात ५० ते ६० मुलांची विक्री केली, तर उर्वरित मुले तामिळनाडूला विकण्यात आली. चाचणीत त्यांनी …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी शाळेच्या जिमखाना हॉलचे चौकट पूजन कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी शाळेच्या क्रीडांगणावरील जिमखाना हॉलचे चौकट पूजन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. संतोष रमेश मंडलिक हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील, संचालक श्री. पी. पी. …

Read More »

महामेळावा यशस्वी करणारच; तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

  बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी वॅक्सिन डेपो येथे होणाऱ्या महामेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

महामेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण

  बेळगाव : १९५६ साली भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश अन्यायाने म्हैसूर राज्यात (आताचे कर्नाटक) डांबण्यात आला. हा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी येथील मराठी भाषिक जनता गेली ६६ वर्षे विविध मार्गानी प्रयत्न करीत आहे, सत्याग्रह, मोर्चे, धरणे, उपोषणे, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या भेटीगाठी अशा विविध मार्गांनी …

Read More »

एसीपी नारायण बरमणी यांची अतिरिक्त एसपी पदी बढती

  बेळगाव : बेळगाव शहरात सीपीआय, एसीपी म्हणून नारायण बरमणी यांना पदोन्नती मिळाली असून त्यांना अतिरिक्त एसपी म्हणून बढती देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात कर्तव्य पूर्ण केलेल्या बेळगाव मार्केटचे एसीपी नारायण बरमणी यांच्यासह एकूण तीन पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. नारायण बरमणी, रमण गौडा हट्टी आणि महंतेश्वर जिद्दी यांना अतिरिक्त …

Read More »

डी. के. शिवकुमारना तात्पुरता दिलासा

  सीबीआय तपासाला आव्हान देणारी याचिका मागे घेण्याची परवानगी बंगळूर : उच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना त्यांच्यावरील बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणाच्या सीबीआय तपासाला आव्हान देणारी याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. कारण राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीबीआय चौकशीस दिलेली परवानगी मागे घेतली होती. न्यायालयाच्या या आदेशामुळे शिवकुमार यांना कायदेशीर …

Read More »

केंद्राच्या आधी कर्नाटकाने सुरू केले स्टार्टअप धोरण

  मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचा दावा; “बंगळूर टेक समिट”चे उद्घाटन बंगळूर : केंद्र सरकारच्या आधी २०१५ मध्ये काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये स्टार्टअप धोरण सुरू केले होते, असा दावा मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आज येथे केला. कर्नाटक सरकारने स्टार्टअप धोरण सुरु करून एक दूरदर्शी पाऊल उचलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शहरातील …

Read More »

बैलहोंगल प्रांताधिकारी लोकायुक्तांच्या जाळ्यात

  बेळगाव : बैलहोंगल उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी मंजुनाथ अंगडी 60 हजारांची लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडला आहे. रामदुर्ग तालुक्यातील चिक्कोप्प एसके गावातील रवी अज्जे यांच्याकडे मंजुनाथने जमिनीच्या कागदपत्रात दुरुस्ती करण्यासाठी 60 हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी रवीने बेळगाव लोकायुक्त ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंजुनाथ याला जाळ्यात …

Read More »

कॅपिटल वन एकांकिका जाहीर; 3 व 4 फेब्रुवारीला होणार स्पर्धा

  बेळगाव : सहकार क्षेत्रातउत्तरोत्तर प्रगती साध्य करीत असलेल्या कॅपिटल वन संस्थेच्या पंधराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एकांकिका स्पर्धा – 2024 जाहीर झाल्या आहेत. विविध पृथ्यकरणाच्या आधारावर वर्षानुवर्षे या स्पर्धा पारदर्शक व लोकप्रिय होत असून मागील वर्षाप्रमाणेच नविन स्वरुपात व सुधारीत नियमावलींच्या अधारावरच यंदाची स्पर्धा आंतरराज्य व बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म. ए. समितीचा महामेळाव्यासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक ३० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे होणार आहे. या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, मराठी …

Read More »