बेळगाव : सहकार क्षेत्रातउत्तरोत्तर प्रगती साध्य करीत असलेल्या कॅपिटल वन संस्थेच्या पंधराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एकांकिका स्पर्धा – 2024 जाहीर झाल्या आहेत. विविध पृथ्यकरणाच्या आधारावर वर्षानुवर्षे या स्पर्धा पारदर्शक व लोकप्रिय होत असून मागील वर्षाप्रमाणेच नविन स्वरुपात व सुधारीत नियमावलींच्या अधारावरच यंदाची स्पर्धा आंतरराज्य व बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आशा दोन गटात होणार आहे.
स्थानिक पातळीवर नवनवीन कलाकार दिग्दर्शक लेखक निर्माण व्हावेत या उध्येशाने स्पर्धेची सुरुवात करण्यात होती. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तिन्ही राज्यातून आजवर शेकडो नाट्य संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.आंतरराज्य गटा मधील संघ छाननी व आभासी (virtual) निवडले जाणार असून शालेय गटात जिल्ह्यतील विध्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे.
अनेक वर्षांचा स्पर्धा आयोजनाचा अनुभव, विविध राज्यातून नाटयकर्मींचा प्रतिसाद व चौखंदळ बेळगांवकर नाट्यरसिक या सर्वांच्या सहकार्याने पुन्हा एकदा दर्जेदार एकांकिकांची मालिका अनुभवयास मिळेल असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
नाट्यरसिक व कलाकारांनी नेहमी प्रमाणे यंदाही स्पर्धांना उदंड प्रतिसाद देऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन करुन “कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा-2024” दि. 3 व 4 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
यावेळी संस्थेचे संचालक शाम सुतार, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, शरद पाटील, सदानंद पाटील, कर्मचारीवर्ग व हितचिंतक उपस्थित होते.
प्रवेश पत्रिका पाठवण्याची अंतिम तारीख 12/01/2024 असून स्पर्धेसाठी असणारी प्रवेश पत्रिका व इतर माहिती 9343649005, 9343649006 या क्रमांकाशी संपर्क साधावा, अथवा httpps://www.facebook.com/capitalone.in/ या संकेस्थळावरून उपलब्ध करून घ्याव्यात असे अवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
याच प्रमाणे अखिल भारतीय स्थारावरील एकांकिका लेखन स्पर्धा व स्थानिक विद्यार्थ्यांसाठी एसएसएललसी व्याख्यानमाला लवकरच जाहीर करण्यात येतील असाही उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.