Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

प्रथम वर्षातील हुशार विद्यार्थ्यांना पात्रता चाचणीद्वारे शिष्यवृत्ती : महांतेश कवटगीमठ

  बेळगाव : पीयूसी प्रथम वर्षातील हुशार विद्यार्थ्यांना पात्रता चाचणीद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केएलई संस्थेने घेतला आहे अशी माहिती केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी दिली.बेळगावात मंगळवारी केएलई संस्थेच्या आरएलएस कॉलेजच्या सभागृहात पत्रकार परिषदेला संबोधित करताना केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ म्हणाले की, 1916 मध्ये स्थापन झालेल्या केएलई संस्थेने आज …

Read More »

…म्हणे सुवर्णसौधमुळे सीमालढा संपुष्टात : विधान परिषद अध्यक्षांचा अजब तर्क

  बेळगाव : बेळगाव सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढा देत आहे. बेळगाव येथे सुवर्ण विधानसभा बांधण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावच्या सुवर्णसौध येथे आयोजित केले जात आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा लढ्याचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे, असा अजब तर्क कर्नाटक विधान …

Read More »

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना दररोज सात तास वीजपुरवठा

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; ऊर्जा विभागाची प्रगती आढावा बैठक बंगळूर : राज्यातील सिंचन पंपाना आजपासून सात तास वीज पुरवठा केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. वीज टंचाईवर मात करण्यासाठी १५०० कोटी रुपयांची गरज आहे, जी बचत आणि अनुदानाच्या पुनर्वितरणातून पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. आज गृह कार्यालय …

Read More »

सरकारपुढे बस दरवाढीचा प्रस्ताव नाही : रामलिंगा रेड्डी

  बंगळूर : परिवहन महामंडळाच्या बस भाड्यात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले बसवराज बोम्मई यांनी एम. आर. श्रीनिवास मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती, जे सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव होते. …

Read More »

अतिक्रमित जागेवरील बांधकाम हटवा; बिजगर्णी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : बिजगर्णी येथील सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधले आहे. उद्देशपूर्वक जागेवर अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण हटवून संबंधितावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बिजगर्णी ग्रा. पं. व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकऱ्यांना देण्यात आले. बिजगर्णी येथील सर्व्हे क्र. १९६ मध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. बिजगर्णी ग्राम सभेमध्ये ग्रा. …

Read More »

ठोस आश्वासनानंतर सचिन पाटील यांचे उपोषण मागे

  बेळगाव : मुतगा पीकेपीएसमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण अन्नत्याग करणार असा निर्धार करून आमरण उपोषण करणाऱ्या सचिन पाटील या युवा शेतकऱ्याला आज पाचव्या दिवशी यश आले आहे. सहकार खात्याकडून विशेष पथकाद्वारे तात्काळ मागील दहा वर्षाचे ऑडिट करणार असे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर सहकार …

Read More »

‘गणेश दूध’तर्फे उत्पादकांना दीपावली भेट; उद्या बोनस जमा

  बेळगाव : बेळगुंदी क्रॉसवरील गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दीपावलीनिमित्त उत्पादकांना बोनस वाटप करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. ७) रोजी मार्च २०२३ पर्यंत दूध पुरवठा केलेल्या उत्पादकांच्या बँक खात्यात बोनस जमा केला जाईल, अशी माहिती केंद्राचे प्रमुख उमेश देसाई यांनी दिली. ते म्हणाले, म्हैस दुधाला प्रतिलिटर अडीच रुपये तर गाय …

Read More »

कर्नाटकातील मराठा समाजाचा भव्य मेळावा 26 नोव्हेंबरला : श्यामसुंदर गायकवाड यांची माहिती

  हुबळी : कर्नाटक राज्यात 50 लाखाहून अधिक मराठा समाज बांधव आहेत. समाज बांधवांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने 26 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बनवासी येथे अखिल कर्नाटक मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या हिताच्या …

Read More »

१५ नोव्हेंबरला दुष्काळी परिस्थितीचा अहवाल द्या

  मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हा पालक मंत्र्यांना राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा दौरा करून १५ नोव्हेंबरला सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील २३६ पैकी २१६ तालुके अपुऱ्या पावसामुळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्देश जारी करण्यात आला आहे. …

Read More »

लोकसभा निवडणुकीत २० जागा जिंकण्याचे कॉंग्रेसचे लक्ष्य

  मुख्यमंत्री बदलावर जाहीर वक्तव्यास मज्जाव बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या २८ जागांपैकी किमान २० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निवासस्थानी उपहार बैठकीचे आयोजन केले होते. मंत्री व आमदारांनी …

Read More »