Sunday , July 26 2026
Breaking News

‘गणेश दूध’तर्फे उत्पादकांना दीपावली भेट; उद्या बोनस जमा

Spread the love

 

बेळगाव : बेळगुंदी क्रॉसवरील गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दीपावलीनिमित्त उत्पादकांना बोनस वाटप करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. ७) रोजी मार्च २०२३ पर्यंत दूध पुरवठा केलेल्या उत्पादकांच्या बँक खात्यात बोनस जमा केला जाईल, अशी माहिती केंद्राचे प्रमुख उमेश देसाई यांनी दिली.

ते म्हणाले, म्हैस दुधाला प्रतिलिटर अडीच रुपये तर गाय दुधाला प्रतिलिटर एक रुपयाप्रमाणे बोनस दिला जात आहे. याआधी दर सहा महिन्यातून एकदा बोनस दिला जात होता. आता शेतकऱ्यांना एकरकमी जास्त रक्कम मिळावी, यासाठी वर्षातून एकदा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. सीमाभागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा व्हावा, यासाठी सर्वाधिक दूध दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

मॅनेजर सुधाकर करटे म्हणाले, गणेश दूधतर्फे वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात. लम्पिस्किन आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावर मालकांना सहा हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले जाते. या उपक्रमाचा विविध गावातील शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. विश्वासार्हता असल्याने नवनवीन संस्था जोडल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालिका अरुंधती देसाई उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *