Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

सोने चोरी प्रकरणी दोन आंतरराज्य चोरट्यांना बेड्या

  अथणी पोलिसांची कारवाई बेळगाव (वार्ता) : अथणी पोलिसांच्या मोठ्या कारवाईत दोन आंतरराज्य चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. वेणुगोपाल यांनी सांगितले. अथणी शहर पोलीस स्थानकात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अथणी व नजीकच्या बसस्थानकावर …

Read More »

भाजप-धजद युतीला पक्षांतर्गत वाढता विरोध

  दोन्ही पक्षांना दूरगामी परिणामाची भिती बंगळूर : भिन्न विचारसरणीचे दोन पक्ष असलेल्या भाजप- धजद यांच्यातील युतीला विरोध पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात तीव्र विरोध होत आहे. काही आमदार उघडपणे विरोध करत आहेत, तर काही पक्षांतर्गत मतभेद नोंदवत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यावर हे मतभेद निर्माण झाल्याने युतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी …

Read More »

जनतेला पुरेशी सेवा द्या; मंत्री बी. एस. सुरेश यांचे निर्देश

  स्थानिक स्वराज्य संस्था प्रगतीचा आढावा बैठक बेळगाव ( वार्ता ) शासनाच्या निर्देशानुसार विभाग स्तरावर येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये निर्धारित कालावधीत इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, बोअरवेलची दुरुस्ती, पाईप लाईन बसवणे यासह जनतेला पुरेशा सेवा पुरविल्या जाव्यात, अशा सूचना नगरविकास मंत्री बी. एस. सुरेश यांनी दिल्याबेळगाव विभागातील नागरी …

Read More »

भाग्यनगरमधील ‘ती’ जागा खासगी

  कोतवाल कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव (वार्ता) : भाग्यनगर येथील (सीटीएम नं. ३८६९) सातवा क्रॉसमधील जागेवर अनगोळ येथील कोतवाल कुटुंबीय आणि मुस्लीम जमातने आपला हक्क सांगितला आहे. कुरूंदवाड सरकारने इनाम स्वरुपात ही जागा १४१८ मध्ये दिल्याचे कोतवाल कुटुंबीय आणि जमातचे म्हणणे आहे. तसेच यापूर्वी या जागेचा वापर कब्रस्तानसाठी करण्यात आला …

Read More »

राज्य अक्षरदासोह समितीतर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

  बेळगाव (वार्ता) : अक्षरदासोह योजना सुरू झाल्यापासून मुलांची शैक्षणिक सुधारणा, बालकांची गैरहजेरी रोखणे, कुपोषण रोखणे, १ लाख १७ हजार महिलांनी गरम अन्न शिजवून ५८ लाख ३९ हजार गरीब विद्यार्थ्यांना दूध दिले आहे. शिक्षण विभागाच्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये हे काम सुरू असून योजनेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निधी पगारवाढ यासह विविध …

Read More »

समाजसेवक निगाप्पांना भेकणे यांचा वसा पुढे घेऊन जाणे गरजेचे : माजी नगरसेवक अनिल पाटील

  विविध सामाजिक संस्थांच्यातर्फे मार्कंडेय साखर कारखान्याचे नूतन संचालक व कार्यकर्त्यांचा सत्कार बेळगांव : आजचा तरुण हा राष्ट्राचा कणा आहे. तरुणांनी व्यसनापासून दुर राहून निरोगी राहिले पाहिजे व राष्ट्राचा कणा मजबूत ठेवला पाहिजे. समाजसेवा करणारे योद्धा ग्रूप प्रत्येक गावात घरोघरी निर्माण व्हायला हवेत; थोर समासुधारकांचा वसा जपण्यासाठी तरुण पिढीने आज …

Read More »

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया भक्कम केल्यास विकासाला बळ मिळते

  तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार बेळगाव : जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. नव्हे नव्हे मानवी जीवनाची शिक्षण ही मूलभूत गरज आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण प्रत्येक टप्प्यावर शिकत असतो म्हणून आपण सर्वानी शिक्षणाचे पावित्र्य जपायला हवे. शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचे साधन होय …

Read More »

‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या वतीने व्हीलचेअर भेट

  बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या वतीने बेळगांव येथील शासकीय उच्च प्राथमिक कन्नड शाळा, शास्त्री-नगर येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका मुलीला व्हीलचेअर भेट देण्यात आली. कार्यकर्त्यानी शाळेच्या शिक्षिकांना अगोदर न कळवता अचानक या शाळेला भेट दिली, मुलीच्या आईलापण (ज्या सदर मुलीची दैनंदिन काळजी घेतात) आश्चर्यचकित करण्यासाठी थोड्यावेळाने शाळेत आमंत्रित करण्यात …

Read More »

केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाने घेतलेला आढावा

  बेळगाव जिल्ह्यात २.७८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची आज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. आज शुक्रवारी (6 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’चे कार्य कौतुकास्पद : मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे

  बेळगाव : नवहिंद मल्टीस्टेट सोसायटी व दौलत सहकारी साखर कारखाना तारण गहाण कर्जाचा एक दशकाहून अधिक काळ चाललेला सर्वोच्च न्यायालयातीन लढा ‘नवहिंद सोसायटी’ने जिंकल्याने सहकार क्षेत्रात नवहिंदचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे प्रतिपादन मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुरेश वाबळे यांनी केले. ते अहमदनगर येथे आयोजित केलेल्या मल्टीस्टेट फेडरेशनच्या सातव्या वार्षिक …

Read More »