Saturday , June 6 2026
Breaking News

सोने चोरी प्रकरणी दोन आंतरराज्य चोरट्यांना बेड्या

Spread the love

 

अथणी पोलिसांची कारवाई

बेळगाव (वार्ता) : अथणी पोलिसांच्या मोठ्या कारवाईत दोन आंतरराज्य चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. वेणुगोपाल यांनी सांगितले.
अथणी शहर पोलीस स्थानकात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अथणी व नजीकच्या बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या बॅग व पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. शहर बस स्थानकावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या महिलांची चौकशी केली असता, त्या महिलांमध्ये महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन महिला असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाच्या आदेशानुसार हे दागिने मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
अथणी गुन्हे विभागाच्या पथकाने कारवाईत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुरस्कार देणार असल्याचे सांगितले.यावेळी अथणी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, कर्मचारी पी. बी. नाईक, ए. ए. इरकर, एम. ए. पाटील, जे. एच. डांगे, एम. एन. खोत, जे. आर. असोदे, सविता कट्टी, विनोद ठकन्नवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *