Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते कावळेवाडीच्या खेळाडूंचा सन्मान

    बेळगाव : कावळेवाडी गावातील उदयोन्मुख खेळाडू प्रेम बुरुड (सातवी), पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर (नववी) यांनी नुकताच झालेल्या शालेय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून त्याची 80 किलो वजन गटात राज्यस्तरीय निवड झाली. …

Read More »

बेळगावच्या राजाचे मोठ्या उत्साहात आगमन

  बेळगाव : यंदा गणेश चतुर्थीला वेगळाच रंग आला आहे. प्रत्येक मंडळातील गणेश मुर्ती किती उंच आणि कोणत्या स्वरूपात असते, तेथील मंडपातील सजावट कशी असते हे पाहायला भाविकांची गर्दी होते. अशीच गर्दी आजही बेळगावातील धर्मवीर संभाजीराजे चौकात गुरुवारी रात्री झाली जेव्हा बेळगावचा राजाचे आगमन शहरात झाले. तेव्हा बेळगावचा राजाची गणेश …

Read More »

श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी सोसायटीचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

  बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी ठीक सकाळी 11.30 वाजता शंकर-पार्वती मंगल कार्यालय, उचगाव -कोवाड रोड उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. …

Read More »

पायोनियर बँकेला 1 कोटी 55 लाखाचा निव्वळ नफा

  बेळगाव : 117 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 7 लाख 87 हजाराचा ढोबळ नफा झाला असून 1 कोटी 55 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बँकेची 117 वी …

Read More »

तिरुपतीजवळील अपघातात बेळगाव येथील पाच जणांचा मृत्यू

  हैदराबाद : आंध्र प्रदेश येथील केव्हीपल्ली तालुक्यातील मथमपल्ली येथे झालेल्या भीषण वाहन अपघातात तिरुपतीला निघालेल्या पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले असून सर्व रहिवासी बेळगाव जिल्ह्यातील आहेत. बेळगाव जिल्ह्यातील असलेले भाविक क्रूझर वाहनातून तिरुपतीला निघाले होते. थिंपप्पाचे दर्शन घेऊन सर्व जण आपल्या मूळ गावी परतत …

Read More »

मराठा आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करा; मराठा समाज सुधारणा मंडळाकडून पत्र

  बेळगाव : महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात संसदेत आगामी विशेष अधिवेशनात आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर करा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या ही मागणी मराठा समाज सुधारणा मंडळाने पंतप्रधानांकडे एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासला असून महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून शासकीय सेवा आणि …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळग्रस्त

  अधिकृत घोषणा; राज्यातील १९५ तालुके, बेळगाव, खानापूरला वगळले बंगळूर : राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २३६ तालुक्यांपैकी राज्य सरकारने २०२३ मधील १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहेत. त्यात बेळगाव जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश असून दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून बेळगाव व खानापूर तालुक्याना वगळण्यात आले आहे. मध्यम अवर्षण प्रवण तालुक्यातही त्यांचा …

Read More »

बेळगाव शहरात उद्या वीज पुरवठा खंडित

  बेळगाव : तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव आणि गणेशोत्सव सणाच्या दुरुस्तीच्या कारणास्तव शुक्रवारी (15) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण बेळगाव शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. टिळकवाडी, मारुती गल्ली, हिंदवाडी, जक्कीनहोंडा, एस.व्ही. कॉलनी, पाटील गल्ली, बेळगाव शहर, एमईएस, कॅम्प, नानावाडी, शहापुर आणि कपिलेश्वर रोड फीडर येथून केला जाणारा …

Read More »

वाघवडे इस्कॉन मंदिरास आर. एम. चौगुले यांची भेट

  गोकुळाष्टमी कार्यक्रमात घेतला सहभाग बेळगाव : मुख्य इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यानंतर आठवडाभर वेगवेगळ्या शाखेत मोठ्या जल्लोषात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने  बुधवारी वाघवडे येथे सकाळपासूनच जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वाघवडे येथील इस्कॉनच्या राधेकृष्णा मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात …

Read More »

बेळगाव महापालिकेने ठोठावला एल अँड टी कंपनीला 21 कोटींहून अधिक दंड!

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निकृष्ट दर्जाच्या कामासाठी एल अँड टी कंपनीला २१ कोटी ४६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बेळगावला सतत पिण्याचे पाणी पुरविण्याची व इतर कामांची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीने 2021-2025 ची निविदा प्राप्त केली होती. मात्र सध्या तीन वर्षाचा कालावधी पूर्ण …

Read More »