Sunday , September 20 2026
Breaking News

मराठा आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करा; मराठा समाज सुधारणा मंडळाकडून पत्र

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात संसदेत आगामी विशेष अधिवेशनात आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर करा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या ही मागणी मराठा समाज सुधारणा मंडळाने पंतप्रधानांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासला असून महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून शासकीय सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याची मागणी वारंवार होत आहे. महाराष्ट्र राज्यानेही आपल्या आरक्षण धोरणात सुधारणा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. आरक्षणाचा कोटा 50% च्या पुढे गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला फटकारले असेही या पत्रात म्हटले आहे. आम्ही महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा देत आहोत असे मराठा समाज सुधारणा मंडळाने म्हटले आहे.

या संघटनेच्या 10 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी 50% कोट्याची मर्यादा वाढविण्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात योग्य ती पाऊले उचलून आरक्षण देण्यासंदर्भात पुढाकार घेण्यात यावा. जेणेकरून महाराष्ट्रातील मराठ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळतील असेही या पत्रात म्हटले आहे. मराठा समाज सुधारणा मंडळाच्या पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रावर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सचिव जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर आदींच्या सह्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *