बंगळूर : सीबीआयने केरळस्थित जयहिंद वाहिनीला नोटीस बजावून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चॅनलमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील मागितला आहे. काँग्रेस नेत्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. एजन्सीची बंगळुर शाखा शिवकुमार यांच्या विरोधात खटल्याचा तपास करत आहे, त्यांनी जयहिंद कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना …
Read More »LOCAL NEWS
जीवनविद्या मिशनच्या वतीने महारक्तदान शिबीर संपन्न
बेळगाव : सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी गंगापुरी महाराज मठ, कोरे गल्ली शहापूर या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर श्री. माधव …
Read More »विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहे साफ करण्यास सक्त मनाई
विद्यार्थ्यांचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई बंगळूर : सरकारने राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल करण्यास सक्तीने बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी परिपत्रक काढून कडक सूचना दिल्या आहेत. आयुक्त बी. बी. कावेरी यांनी परिपत्रकात …
Read More »राज्यात 2 जानेवारीपासून पुन्हा कोविड प्रतिबंधक लस
बंगळूर : राज्यात कोविडचे जेएन १ उत्परिवर्तन वाढत असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सरकार दोन जानेवारीपासून राज्यात कॉर्बीवॅक्स लस देणार असल्याची माहिती उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही लस देण्यास सरकार तयार आहे. राज्यात कोविड संसर्गामुळे मृत्यू होत आहेत. राज्यात सावधगिरीचे लसीकरण …
Read More »युवा समितीच्या वतीने उद्या निवेदन
बेळगाव : कन्नड संघटना आणि कर्नाटक प्रशासनाने चालविलेल्या कन्नड फलक बळजबरी, मराठी फलकांच्या अवमानाविरुद्ध व दोन भाषिकामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. पोलीस आयुक्त बेळगाव व महानगर पालिका आयुक्त, बेळगाव यांना निवेदन देण्यात …
Read More »कॅपिटल वन व्याख्यानमालेची दिमाखात सुरुवात
बेळगांव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या एस.एस.एल.सी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती महाविद्यालयाचे निवृत प्राचार्य आर. के. पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन शाम सुतार, मराठी विषयाचे व्याख्याते ठळकवाडी हायस्कूलचे श्री. सी. …
Read More »19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी रोजी
येळ्ळूर : सालाबाद प्रमाणे यावर्षीही 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. साहित्य संघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. प्रारंभी प्रा. सी. एम. गोरल यांनी उपस्थित साहित्य संघाच्या सदस्यांचे …
Read More »१० वीच्या विद्यार्थ्यासह सहलीतील नको ते फोटो लीक; मुख्याध्यापिका निलंबित
चिक्कबळ्ळापूर : दहावीच्या विद्यार्थ्यासह शाळेच्या सहलीदरम्यान रोमॅंटिक पोज देत फोटो काढणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून कर्नाटकातील मुरुगमल्ला व्हिलेज गव्हर्नमेंट हायस्कूलच्या मुख्यध्यापिका पुष्पलता आर. यांना निलंबित करण्यात आले आहे. हे वादग्रस्त कथित ‘फोटोशूट’ चिक्कबळ्ळापूर येथे एका शैक्षणिक सहलीदरम्यान घडले. फोटोंमध्ये मुख्याध्यापिका विद्यार्थ्याला मिठी मारताना आणि …
Read More »उडुपी खून प्रकरणः मारेकरी चौगुलेचा जामीन अर्ज फेटाळला
उडुपी : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या उडुपी जिल्ह्यातील नेझर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण चौगुले याने दाखल केलेला जामीन अर्ज उडुपी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी चौगुले आधीच न्यायालयीन कोठडीत असून त्याने १४ डिसेंबर रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर …
Read More »बेळगाव जिल्हा सह. बँकर्स असो.ची, निवडणूक संपन्न
बेळगाव : 38 बँका सभासद असलेल्या येथील बेळगाव जिल्हा अर्बन/सौहार्द सहकारी बँक्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक 29 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप बँकेच्या सभागृहात संपन्न झाली. जाने. 2024 ते डिसेंबर 2028 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक घेण्यात आली. बँकेच्या सर्व संचालकांचे स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष श्री. बी. बी. कगगनगी यांनी करून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta