Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवंदना कार्यक्रम साजरा

  बेळगाव : येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे सोमवार (ता.3) रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवंदना कार्यक्रम साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रवी नाईक होते. यावेळी सर्व मान्यवर व शिक्षकांचे विदयार्थ्यांच्या तर्फे पाद्यपूजा व वंदन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांचे पाद्यपूजन करून त्याना वंदन केले. नंतर शाळेतून बदली …

Read More »

अ. भा. नाट्य परिषद बेळगाव शाखेची 23 रोजी निवडणूक

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या बेळगाव शाखेची 2023 ते 2018 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि. 23 जुलै 2023 रोजी बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी येथे होणार आहे. सदर निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अनिल गुडी हे काम पाहणार आहेत. अ. भा. नाट्य परिषद मुंबईच्या बेळगाव शाखेच्या …

Read More »

सैन्यदलातील निवृत्त वर्गमित्राला अनोखी मानवंदना

  तुर्केवाडीतील ९१-९२ दहावी बॅचचा उपक्रम; सपत्नीक मिरवणूक काढून जाहीर सत्कार चंदगड : सैन्यदलातील मोठ्या पदावरुन निवृत्त होऊन घरी परतलेल्या अधिकाऱ्याचा वर्गमित्रांनी गावात मिरवणूक काढून जंगी सत्कार केला. मौजे तुर्केवाडीतील (ता. चंदगड) १९९१-९२ दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. १) ब्रह्मलिंग देवालयात हा सोहळा घडवून आणून एका सैनिकाला अनोखी मानवंदना दिली. …

Read More »

यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नको : प्राचार्या संगीता पाटील

  मराठी अध्यापक संघामार्फत 52 विद्यार्थ्यांचा सत्कार चंदगड : “विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा स्विकार न करता प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. कष्टाने मिळवलेले यश चिरकाल टिकते. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आयुष्याला कलाटणी देतात,” असे प्रतिपादन प्राचार्या संगीता पाटील यांनी केले कारवे येथे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत येथे तलावाचे काम करताना रोजगाराच्या (मनरेगा) महिला कामगार

  बेळगाव : येळ्ळूरच्या मंगाई तलावातील साठलेली गाळयुक्त माती एकमेकांच्या मदतीने बाहेर काढून टाकत होते. जेणेकरून या तलावात येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीचा पाण्याचा साठा होईल व याचा फायदा गावकरी व त्याच्या जनावरांना होईल. ‘मजदूर नवानिर्माण संघाच्या’ माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील व संघटनेचे इतर कार्यकर्ते जिल्ह्यातील …

Read More »

विरोधी पक्षनेताच नव्हे तर प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा आज होणार : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा

  बंगळुरू : विधानमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असले तरी विरोधी पक्ष भाजपने अद्याप विधानसभेसाठी नेता जाहीर केला नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, आज विरोधी पक्ष नेता आणि भाजपकडून नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबत माहिती दिली आहे. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना बीएस येडियुरप्पा …

Read More »

विजेच्या धक्क्याने विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

  बेळगाव : विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसून तरुण विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बाची येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. कुणाल कल्लाप्पा कुट्रे (वय १७, मूळचा रा. रामनगर- कडोली, सध्या रा. बाची) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो शेती व्यवसाय करत होता. दीड …

Read More »

अनैतिक संबंधाच्या संशयातून अंकलगी येथे दोघांचा खून

  बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयातून बेळगाव जिल्ह्यातील अंकलगी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अक्कतंगेरहाळ येथे मंगळवारी दोघांचा खून करण्यात आला आहे. अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन जगदरा (वय ४०) आणि रेणुका माळगी (वय ४२) अशी मृतांची नावे …

Read More »

गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात पुढे जावे : किरण जाधव

  बेळगाव : जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ असं म्हटलं जातं. प्रत्येकांनी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात वाटचाल करून यशोशिखर गाठावे असे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सखल मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले. गोंधळी गल्ली बेळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप …

Read More »

रोटरीकडून मराठी विद्यानिकेतन शाळेला खेळाचे साहित्य भेट

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने मराठी विद्यानिकेतन बालवाडीसाठी खेळाचे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, सदस्य महेश अनगोळकर, सोमनाथ कुडचीकर, डी. बी. पाटील उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. रोटरीच्या वतीने बालवाडी च्या मुलांसाठी फिरता झोपाळा, …

Read More »