Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामपंचायत येथे तलावाचे काम करताना रोजगाराच्या (मनरेगा) महिला कामगार

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूरच्या मंगाई तलावातील साठलेली गाळयुक्त माती एकमेकांच्या मदतीने बाहेर काढून टाकत होते. जेणेकरून या तलावात येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीचा पाण्याचा साठा होईल व याचा फायदा गावकरी व त्याच्या जनावरांना होईल. ‘मजदूर नवानिर्माण संघाच्या’ माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील व संघटनेचे इतर कार्यकर्ते जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन रोजगाराच्या कामगारांना प्रसंगी भेटी देतात, त्यांना मनरेगाची कायदेशीर माहिती देऊन ग्रामपंचायतीकडून सादर केलेल्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबद्दल ‘मजदूर नवानिर्माण संघाच्या’ माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. सदर तक्रारग्रस्त कामगारांच्या बैठका घेऊन आलेल्या समस्यांची चर्चा केली जाते. त्यानंतर या समस्या सोडविण्यासाठी सदरच्या ग्रामपंचायत कचेरीला, तालुक्याच्या कचेरीला किंवा जिल्हा पंचायतीला निवेदने देऊन मनरेगा कामगारांच्या समस्या दुर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, प्रसंगी मोर्च्याद्वारे महत्त्वाचे मुद्दे मांडावे लागतात. संघटनेच्या कार्यकर्त्यांद्वारे वेळोवेळी रोजगाराच्या कामावर जाऊनही तेथील कामाची परिस्थितीची पाहणी करून मार्गदर्शन केले जाते. तसेच महिला कामगारांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबीरे घेतली जातात.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *