Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

बंगळूर येथील बस डेपोत २० खासगी बसेस जळून खाक

  बंगळूर : बंगळूरमधील वीरभद्रनगर येथील बस डेपोमध्ये पार्क केलेल्या २० खासगी बसेसना मोठी आग लागली. ही घटना आज (दि.३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. बंगळूरमधील वीरभद्र नगरमधील गॅरेजजवळील बस डेपोला लागलेल्या आगीत उभ्या असलेल्या सुमारे २० खासगी बसेस जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून …

Read More »

सीमाप्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जवळपास आठ महिन्यानंतर या खटल्याला गती मिळाली आहे. मागील 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये सुनावणी झाली होती त्यानंतर 1 नोव्हेंबर काळ्यादिनी सीमाप्रश्नी सुनावणी असल्यामुळे सीमावासीयांसाठी हा औत्सुक्याचा क्षण ठरणार आहे. तांत्रिक …

Read More »

बेळगावात भ्रष्ट अधिकार्‍यांवर लोकायुक्त छापा

  बेळगाव : भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात लोकायुक्त अधिकार्‍यांनी आज सकाळी सकाळी दोन अधिकार्‍यांवर छापा टाकला. बेळगाव पंचायत राज विभाग एईई एम. एस. बिरादार यांच्या घरावर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी जे. रघू यांच्या पथकाने घरावर छापा टाकला. बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून लोकायुक्तांनी विश्वेश्वरय्या नगरमधील श्रद्धा अपार्टमेंट तसेच कित्तूर …

Read More »

शाळा सुधारणा समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : शाळा सुधारणा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना उद्या सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० निवेदन देण्यात येणार असून शाळेतील विविध समस्या त्वरित सोडवाव्यात आणि शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी बेळगाव तालुक्यातील सर्व शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षण प्रेमी यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. सरकारी शाळेमध्ये …

Read More »

जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा विषयावर शिबिराचे आयोजन

  डॉ. माधव प्रभू यांनी केले महिला भगिनींना मार्गदर्शन बेळगाव (प्रतिनिधी) : जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने महिलांमधील उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव येथील जय जवान हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केएलई इस्पितळाचे डॉक्टर आणि प्राध्यापक माधव प्रभू उपस्थित होते. इंडियन मेडिकल …

Read More »

माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगाव शिवसेनेच्या वतीने स्वागत

  बेळगाव : माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगावात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर व अरुण दुधवाडकर यांचे रविवारी दुपारी सांबरा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. …

Read More »

ध्वजस्तंभ लावताना विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगावात सध्या राज्योत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. ध्वजस्तंभ लावताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बैलहोंगल तालुक्यातील वकुंड गावातील बसस्थानकासमोर ध्वजस्तंभ लावत असताना ही दुर्घटना घडली. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू होती. ध्वज लावत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच …

Read More »

कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न हास्यास्पद

  भाजपवर जोरदार हल्ला; आमदाराना अमिषाच्या आरोपाने खळबळ बंगळूर : कर्नाटक भाजपने राज्यातील आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. त्यांचा हा प्रयत्न हस्यास्पद असून तो यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. मंड्या काँग्रेसचे आमदार रविकुमार गौडा (गनिगा) यांनी वादाला तोंड फोडल्यानंतर हा आरोप झाला आहे. भाजप नेत्यांची एक …

Read More »

सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

  बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांचा इशारा बेळगाव : सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर यापुढे पोलीस विभागाची करडी नजर असणार आहे. सोशल मीडियावरील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयामध्ये मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त …

Read More »

प्रशासनाकडून श्री महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

  बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका आणि जिल्हा परिशिष्ट कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी श्री महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील कुमार गंधर्व रंग मंदिर येथे आज सकाळी श्री महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महापौर शोभा …

Read More »