Wednesday , April 22 2026
Breaking News

वेदांत मिसाळे याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : स्वीमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटुनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्य उपकनिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2023 -24 मध्ये अभिनंदन यश संपादन केले आहे विशेष म्हणजे या स्पर्धेद्वारे बेळगावच्या वेदांत मिसाळे याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक चमूत निवड झाली आहे.

कर्नाटक राज्य जलतरण संघटनेतर्फे गेल्या 30 मे ते 2 जून या कालावधीमध्ये बेंगलोरच्या बसवनगुडी एक्वेटिक सेंटर येथे राज्यस्तरीय उपकनिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत स्वीमर्स क्लब बेळगावच्या वेदांत मिसाळे यांनी 100 मी. बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीत रौप्य पदक तर 50 मी. बटरफ्लाय शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे अहीका हलगेकर हिने 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत कांस्यपदक मिळविले आहे. हे दोन्ही जलतरणपटू शहरातील सुवर्ण जीएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन, तसेच त्यांच्या पालकांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया, लता कित्तूर, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *