Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

खासदार संजय राऊत यांना सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर

  बेळगाव : 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी आचारसंहिता लागू असताना मराठी व कन्नड भाषिकात भाषा वादासह तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयाने आज सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी …

Read More »

बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज अध्यक्षपदी राम भंडारे

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षपदी राम भंडारे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी भारत देशपांडे आणि सचिवपदी विलास बदामी यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी आरएस कुलकर्णी आणि संयुक्त सचिव पदी विलास जोशी यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. उद्यमबाग येथील सेलेब्रेशन्स हॉल या …

Read More »

अपघातात जखमी गायीचे वाचवले प्राण

  बेळगाव : अवजड वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या गायीचे प्राण समाजसेवकांच्या तत्परतेमुळे वाचल्याची घटना बेळगावात घडली आहे. पाटील गल्ली बेळगांव येथे उषाताई गोगटे हायस्कूलसमोर एका गायीला अवजड वाहनाने सोमवारी पहाटेच्या सुमारास धडक दिली. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ ती गाय रस्त्यावर पडली होती. जबरदस्त मार लागल्याने तिच्यावर तातडीने उपचार …

Read More »

बहुभाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन कोंडुसकर यांना विजयी करा : माजी महापौर आप्पासाहेब पुजारी

  बेळगाव : बेळगावच्या सीमाभागाचा संघर्ष हा प्रत्येकाच्या रक्तातून निर्माण झालेला आहे. हौतात्म्य पत्करलेल्यांचे श्रम अजिबात वाया जाऊ दिले जाणार नाहीत. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी प्रत्येक मराठी माणसाने घराघरातून बाहेर पडायला हवे आणि आपल्या भगव्या झेंड्याच्या खाली सर्व भाषिक समाजाच्या उन्नतीसाठी सर्व बहुभाषकांनी एकत्र येऊन समोरच्या बलाढ्य प्रतिस्पर्धीवर मात करण्यासाठी पुढाकार …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांची आजची पदयात्रा भाग्यनगरात

  बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 3 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ अनगोळ नाका येथून चिदंबर नगर येथून भाग्यनगरमधील सर्व क्रास फिरून सांगता होईल. पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला …

Read More »

अनाथ वृद्ध महिलेवर समाजसेविका माधुरी जाधव यांनी केले अंत्यसंस्कार

  बेळगाव : जगी ज्यास कोणी नाही, त्याच्यासाठी देव (परमेश्वर) आहे असे मानले जाते. अर्थात परमेश्वराच्या कृपेनेच काही व्यक्तींनी समाजाप्रती असलेल्या सदभावनेतून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. कोणतीही सार्वजनिक आपत्ती असो किंवा वृद्ध आणि अनाथ व्यक्तींवरील अंत्यसंस्कार जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन या कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार …

Read More »

बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रचार सभा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर येत असून बुधवार दि. ३ मे रोजी त्यांच्या सीमा भागात दोन प्रचार सभा होणार आहेत. कारभार गल्ली वडगाव आणि संयुक्त महाराष्ट्र चौकात या सभा होणार आहेत. दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत …

Read More »

विजयनगर, विनायक नगर भागामध्ये ऍड. अमर येळूरकर यांच्या विजयाचा निर्धार

  बेळगाव : दिनांक 2 मे रोजी सकाळी बेळगाव उत्तर मतदारसंघातील विजयनगर, विनायक नगर, बुडा स्किन नंबर 51  या भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. श्री. अमर येळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. मराठी बहुलभाग असणाऱ्या या भागातून नागरिकांनी अमर येळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला भागातील अनेक घरांमध्ये येळूरकर यांचे …

Read More »

राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा समितीचे मावळे व्हा : माजी आमदार मनोहर किणेकर

  हिंडलगा : राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे मावळे व्हा, असा सल्ला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला. काल म ए समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांच्या हिंडलगा परिसरात झालेल्या प्रचार पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मराठीच्या अस्तित्वासाठी येत्या दहा मे रोजी …

Read More »

रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ विविध भागात होणार प्रचार

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचा येत्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी जोरदार प्रचार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. मंगळवारी मजगाव येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवारी व बुधवारी महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या …

Read More »