Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

मल्लिकार्जुन वृद्धाश्रमामध्ये एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा

  बेळगाव : शाहूनगर येथील श्री मल्लिकार्जुन वृद्धाश्रममध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमातील आजींच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच आश्रमातील आजींना बिस्कीट, पुलावचे वाटप सुद्धा करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते वृद्धाश्रममधील आजींचा शाल …

Read More »

शहापूर परिसरातील विहिरींचे पाणी दुषित….!

  बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून खराब असलेली ड्रेनेज वाहिकेमुळे कोरे गल्ली येथील विहिरींचे पाणी दूषित झाले असून यासंबधी गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्याकडे करण्यात आली, पण हे तात्पुरती व्यवस्था करत असल्यामुळे पुन्हा पुन्हा ड्रेनेज वाहिका खराब तर होतच आहे पण विहिरी कायमस्वरुपी …

Read More »

आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

  केंद्रीय पथक बंगळुरात दाखल; अधिकारी व राजकीय पक्षांशी चर्चा बंगळूर : राज्यात निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढत असतानाच, निवडणूक आयोगही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्व प्रकारची तयारी करत आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे आज तीन दिवसांसाठी राज्यात आगमन झाले. विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसह …

Read More »

विजय संकल्प यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती : डॉ. रवी पाटील

बेळगाव : भाजपच्या विजय संकल्प यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. रवी पाटील यांनी केले. विजय संकल्प यात्रेला सुरुवात झाल्यानंतर ते बोलत होते. भाजप आमदारांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात अपेक्षेपेक्षा अधिक विकासकामे करून प्रभाव पाडला आहे. पक्षामध्ये कोणताही गोंधळ …

Read More »

बसवेश्वर चौक खासबाग येथे कचऱ्याचे साम्राज्य

  बेळगाव : बेळगाव शहरात कचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले असून महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वॉर्ड क्र. 27 मध्ये कचरा उचल नियमित होत नाही. अवघ्या 100 मीटर अंतरावर ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी कचरा टाकणे बंद झाले आहे. मात्र सफाई …

Read More »

उत्तर मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन

  बेळगाव : आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक बांधकाम खाते आणि बेळगाव महापालिकेच्या अनुदानातून हाती घेतलेल्या बेळगाव उत्तर मतदार संघातील विविध विकासकामांचा आज भूमिपूजनाद्वारे शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग व बेळगाव महानगरपालिकेच्या अनुदानातून आज गुरुवारी अशोकनगर, बेळगाव येथील 15 व्या क्राॅसमागील क्रांतिवीर संगोळी रायण्णा शाळेजवळ रस्ता व …

Read More »

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट

  बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कष्टकरी चळवळीला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य पंचायत विभागाने मानद डॉक्टरेट ही पदवी देवून गौरविले आहे. या पदवीमुळे सीमाभागातील एका श्रमजीवी कार्यकर्त्याचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयातर्फे सॅनिटरी पॅडचे वितरण

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने बेळगावमधील मागासवर्गिय वसाहतीत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला. सॅलेटरी पॅडची निर्मिती मराठा मंडळ, बेळगावतर्फे करण्यात येते. या पॅडचे वितरण अनेक महाविद्यालयातील, शाळेच्या …

Read More »

शिवसृष्टीचेही शुद्धीकरण केले पाहिजे : रमाकांत कोंडुसकर

  बेळगाव : राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी मतांसाठी तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या अपमानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने १९ मार्च रोजी राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मराठा मंदिरात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत समिती …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन महाविद्यालयाच्या महिला संघटना तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पदी प्रा. अर्चना भोसले उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी भूषवले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वृषाली कदम यांनी संस्कृत श्लोक …

Read More »