Sunday , September 20 2026
Breaking News

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कष्टकरी चळवळीला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य पंचायत विभागाने मानद डॉक्टरेट ही पदवी देवून गौरविले आहे. या पदवीमुळे सीमाभागातील एका श्रमजीवी कार्यकर्त्याचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी ते सातत्याने आंदोलने करीत असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी शेतामधील तलावांची निर्मिती तसेच पाणी अडवा आणि जिरवा योजनेसाठी स्वत: अथक परिश्रम घेतले आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीचे कार्य करणाऱ्या शिवाजी कागणीकर यांच्या कर्तृत्वाला गौरव लाभल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *