Monday , September 21 2026
Breaking News

उत्तर मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन

Spread the love

 

बेळगाव : आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक बांधकाम खाते आणि बेळगाव महापालिकेच्या अनुदानातून हाती घेतलेल्या बेळगाव उत्तर मतदार संघातील विविध विकासकामांचा आज भूमिपूजनाद्वारे शुभारंभ करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभाग व बेळगाव महानगरपालिकेच्या अनुदानातून आज गुरुवारी अशोकनगर, बेळगाव येथील 15 व्या क्राॅसमागील क्रांतिवीर संगोळी रायण्णा शाळेजवळ रस्ता व गटार बांधकाम, अमननगर मुख्य रस्त्यावरील रेल्वे गेट जवळ रस्ता व गटार बांधकाम, मारुतीनगर येथील एससी मोटर्स जवळील रस्त्याचे काम आणि गटार बांधकाम तसेच जुन्या गांधीनगरातील रस्ताआणि गटार बांधकामाचे भूमिपूजन आज बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी सदर विकास कामे वेळेत पूर्ण केली जावीत, अशी सक्त सूचना आमदार बेनके यांनी उपस्थित ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *