बेळगावात विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाच्या वतीने निदर्शने बेळगाव : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नि:पक्षपातीपणे आवाज उठवावा, या मागणीसाठी आज बेळगावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. बेळगाव येथील राणी कित्तूर चनम्मा सर्कल येथून सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य …
Read More »LOCAL NEWS
बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; १० हून अधिक जखमी
बेळगाव : कर्नाटक परिवहन मंडळाची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दहाहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सांबरा रोडवर घडली. बेळगाव येथील सांबरा रोडवर परिवहन बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन बसमधील १० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »नावगे कारखान्यातील मृत युवकाच्या कुटुंबीयांचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांकडून सांत्वन
बेळगाव : नावगे येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेयनगर येथील यल्लप्पा गुंड्यागोळ या तरुणाच्या कुटुंबीयांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली. यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृत तरुणाच्या आई-वडीलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, ही घटना घडायला …
Read More »येळ्ळूरच्या ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा उद्या अभिषेक कार्यक्रम
येळ्ळूर : श्री ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी सकाळी ठीक 8.00 वा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने त्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन करण्यासाठी मंगळवार दिनांक 6/8/2024 रोजी श्री चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन मंगळवार दिनांक 13/8/2024 …
Read More »तुंगभद्रा धरणाचे १९ वे गेट गेले वाहून
नदीपात्रातील नागरिक चिंतेत; लोकांना सुरक्षितस्थळी हलविले, तज्ञांची समिती तातडीने रवाना बंगळुरू : कोप्पळ तालुक्यातील मुनिराबाद जवळील तुंगभद्रा जलाशयाचा १९ वा क्रस्ट गेट तुटून नदीत पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, गेटची साखळी लिंक तुटल्याने नदीपात्रातील नागरिक चिंतेत आहेत. काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तुंगभद्रा जलाशय फुटला. नदीपात्रातील नागरिकांना सावधगिरीचा …
Read More »कोनेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव : शेतात काम करत असताना थेट खराब झालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 10 रोजी घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, भरमा पावशे हे आपल्या पत्नीसह शेतात काम करत होते. पण अनावधानाने त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याचे लक्षात आल्याने …
Read More »बाप्पाच्या आगमनाची चाहूल, बेळगावच्या राजाचे मुहूर्तमेंढ मोठ्या दिमाखात संपन्न
बेळगाव : नवसाला पावणारा राजा अशी ख्यात असलेल्या बेळगावच्या राजाचे आज 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गणेश मंडप मुहूर्तमेंढ संपन्न झाले. बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बेळगावच्या राजाचे गणेश मंडप मुहूर्तमेंढ पूजन रविवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, माजी आमदार अनिल बेनके व …
Read More »14 ऑगस्ट रोजी “अखंड हिंदुस्थान संकल्प दिन”; शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांची उपस्थिती
बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे -पाटील हे येत्या बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. या दिवशी रात्री 8 वाजता श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावतर्फे आयोजित अखंड हिंदुस्थान संकल्प दिन सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे/वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे 14 …
Read More »भाजपमधील असंतोष नेत्यांची बेळगावमध्ये गुप्त बैठक!
बेळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाला उघडपणे विरोध करणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी पक्षातील कांही नाराज नेत्यांना एकत्र घेऊन बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. विजयेंद्र यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद दिल्याबद्दल भाजपच्या काही नेत्यांनी …
Read More »भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासावर बंधने : गिरीश पतके
गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधनीच्या वतीने बक्षीस वितरण सोहळाचे आयोजन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी यांच्यावतीने निबंध व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी सन्माननीय गिरीश पतके …
Read More »