Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

शिवाजीनगर येथील विद्यार्थ्याच्या हत्ये प्रकरणी एक जण ताब्यात

  बेळगाव : शिवाजी नगर बेळगाव येथील शाळकरी विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. 19 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहराच्या शिवाजी नगर 5 वा क्रॉस येथील प्रज्वल शिवानंद करिगार नावाच्या 16 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. यानंतर त्याचा मृतदेह मुचंडी गावानजीक …

Read More »

गणेश दूध संकलन केंद्राची गरुडझेप कौतुकास्पद : डॉ. आनंद पाटील

वर्धापन दिन व शेतकरी मेळावा उत्साहात उचगाव : श्री गणेश दूध संकलन केंद्राने अल्पावधीतच गरुडझेप घेऊन एक वेगळा ठसा उमटविला आहे. फक्त दूध संकलन न करता दुधापासून अनेक चवदार पदार्थ बनवून ते कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात पोचविले आहेत. दर्जेदारपणामुळे केंद्राचे नाव सर्वतोपरी झाले आहे, असे गौरवोद्गार पशुवैद्यकीय खात्याचे सहाय्यक संचालक …

Read More »

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

  बेळगाव : ऊसाला प्रतिटन 5500 दर मिळावा याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. आजही बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. ‘जय जवान’ ‘जय किसान’ चा नारा देत ऊसाला प्रतिटन 5500 रु. दर देण्याची मागणी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. ऊसाला योग्य …

Read More »

आमदार आनंद मामनी यांच्या निधनामुळे कित्तूर उत्सव लांबणीवर

  बेळगाव : विधानसभेचे उपसभापती आणि सौंदत्ती मतदारसंघाचे आमदार आनंद मामनी यांच्या निधनामुळे ऐतिहासिक कित्तूर राणी चन्नम्मा उत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कित्तूर उत्सव 23, 24 आणि 25 ऑक्टोबर असे तीन सौंदत्ती येथे दिवस होणार होता. आज त्याचा उद्घाटन …

Read More »

सौंदत्तीचे आमदार, कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांचे निधन

  बेंगळुरू : सौंदत्तीचे आमदार, कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी (वय 56) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर बेंगळुरु मनीपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आनंद (विश्वनाथ) चंद्रशेखर मामनी यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ रोजी बेळगाव जिल्ह्यातील सौदती …

Read More »

शिवसेना किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

  बेळगाव : दीपावलीनिमित्त शिवसेना (सीमाभाग बेळगाव) यांच्यातर्फे गतवर्षी आयोजित शिवकालीन भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. शहरातील मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिर येथे शिवसेनेच्या 2021 सालच्या किल्ला स्पर्धेचा हा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार …

Read More »

‘त्या’ शाळकरी मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या!

  शिवाजीनगर येथील रहिवाशांचा पोलीस आयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा बेळगाव : बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवाशांनी 16 वर्षीय शाळकरी मुलाच्या हत्येचा निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात जोरदार निदर्शने केली. दि. 20 ऑक्टोबर रोजी बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावानजीक शिवारात छ. शिवाजीनगर 5 व्या गल्लीतील प्रज्वल …

Read More »

आर्मी स्कूल स्केटर्स अवनीश आणि खुशी यांची राज्यस्तरिय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : आर्मी प्रायमरी स्कूल, जिजामाता स्कूल कॅम्प बेळगावचे विद्यार्थी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटरस यांची 38 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी अवनीश कोरीशेट्टी, खुशी आगासिमनी यांची निवड झाली आहे. हे दोघे ही राज्य चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत हे स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक …

Read More »

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्त्याच्या कामाला चालना

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ते बेळगुंदी गावापर्यंत पक्क्या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर व संबंधित गावचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आज रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यामुळे बेनकनहळी, …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत होणार बेळगांव जिल्ह्यातील मॉडेल ग्रामपंचायत

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायत प्रत्येक विकास कामांमध्ये सक्रिय आहे. विकासकामांना प्राधान्य देणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवून ते यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत नेहमीच प्रयत्नशील असते आणि या सगळ्याचा आढावा घेऊन येळ्ळूर ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास पाहता बेळगाव जिल्ह्यातून येळ्ळूर ग्रामपंचायतीला मॉडेल ग्रामपंचायत करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 …

Read More »