बेळगाव : म. ए. समितीच्या कोव्हिड आयसोलेशन सेंटरला बेळगाव शहरातील विविध सहकारी बँकानी आर्थिक मदत केली. तुकाराम बँकेने एकवीस हजार, मराठा बँकेने पंचवीस हजार आणि पायोनियर अर्बन बँकेने पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तुकाराम को. ऑप बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रदीप ओऊळकर यांनी मदतनिधीचा धनादेश मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केला. …
Read More »LOCAL NEWS
चक्क 366 किलो गांजा पोलिसांनी जाळला
बेळगाव : बेळगाव शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. 77 घटनांमध्ये जप्त केलेला हा गांजा कडोली गावाजवळील गुंजेनहट्टीजवळ जाळण्यात आला. जप्त गांजा जाळण्यासाठी जेसीबीने खड्डा खणला आणि त्यात तो 366 किलो कोरडा गांजा जाळला.बेळगाव शहर पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी सीआर …
Read More »लग्नाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस आणि त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी……
बेळगाव : चर्मकार समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीपाद बेटगिरी आणि त्यांच्या पत्नी निलम बेटगिरी यांनी काल गुरुवारी आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस स्तुत्य उपक्रमासह साजरा केला. सामाजिक बांधिलकीचे ध्यान राखून बेटगेरी दाम्पत्याने सिद्धार्थ बोर्डिंग येथील गरीबांसोबत आपल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. त्याचबरोबर लग्नाच्या रौप्यमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धार्थ बोर्डिंगला …
Read More »बापट गल्लीतील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने गरजूंना रेशन किटचे वाटप
बेळगाव : बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने तसेच बेळगांव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरातील 60 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरीत करण्यात आले.लॉकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आले आहे. अशा कुटूंबाची महिती घेऊन आज मंडळाच्यावतीने किटचे वाटप करण्यात आले. यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे फौजदार आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी …
Read More »कर्नाटक: कुठल्याही धर्माला दुसऱ्या धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार नाही – उच्च न्यायालय
बेंगळुरू : कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असं मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. कोणत्याही धर्माच्या प्रमुखांनी, धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या कोणत्याही धर्मांची अवहेलना करु नये असं न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांनी सांगितलं. दरम्यान आपल्या धर्माबद्दल सांगत असताना इतर …
Read More »कर्नाटक: राज्य सरकारने तौक्ते चक्रीवादळाने २०९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा वर्तविला अंदाज
बेंगळुरू : कर्नाटक सरकारने तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वंकष सर्वेक्षण केले असून अंदाजे २०९.३० कोटी इतके नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला आहे. केंद्राला दिलेल्या निवेदनात, राज्य सरकारने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची यादी दिली असून त्यामध्ये १,०४७ कि.मी. रस्ते, समुद्र-क्षरण संरक्षण भिंती, ४७३ घरे, ७१ शासकीय इमारती, २९ छोटी सिंचन योजना, ७९ …
Read More »भटकी कुत्री पकडण्यासाठी तब्बल 47 लाखांवर खर्च?
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठी 3 वर्षांत तब्बल 47 लाख, 55 हजार 556 रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळवून उजेडात आणली आहे. बेळगाव मनपाने 2014-15, 2017-18 आणि 2019-20 या 3 वर्षांत आपल्या हद्दीतील भटकी कुत्री पकडण्यासाठी एवढा प्रचंड …
Read More »थेट कामगारांपर्यंत आर्थिक मदत पोचवा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार वर्गाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने असंघटीत कामगारांना मदत जाहीर केली आहे ही मदत थेट कामगारांना मिळावी. सदर मदत वाटपात कोणत्याही एजंटचा हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संबधितअधिकाऱ्यांना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात …
Read More »सावली वृद्धाश्रममधील निराधार महिलेचे निधन
हेल्प फॉर निडीकडून अंत्यसंस्कार बेळगाव : बागलकोट येथील गीता अशोक नार्गुंद (वय 74) या त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुले नसल्याने गेले एक वर्षापासून सावली वृद्धाश्रमामध्ये राहत होत्या. त्यांचे आज सकाळी 11.30 वाजता वृद्धाकाळाने वृद्धाश्रमामध्ये निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या मदतीने डॉ. जयवंत पाटील यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीत केला.या …
Read More »भाजप आयोजित रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान
बेळगाव : सौरभ सावंत (भाजप बेळगाव महानगर जिल्हा स्मित एक्झिट मेंबर) यांच्यावतीने दि. 8 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन भाजप खासदार श्रीमती मंगला अंगडी, भाजप बेळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, दीपा कुडची (डायरेक्टर कर्नाटका स्टेट अर्बन वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज बोर्ड), बेळगाव बीजेपी …
Read More »