Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

मध्यवर्तीकडे धावा, ओळखा अनाजीपंताचा कावा!

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात “काय घडतय आणि काय बिघडतय” याची चाचपणी मध्यवर्ती करेल का? असा प्रश्न बेळगावच्या राजकारणात उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्रच इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अनेक तर गुडघ्याला बाशिंग बांधून मीच ग्रामीणचा उमेदवार अश्या थाटात वावरताना दिसत आहेत. सध्या आयाराम तेजीत आहेत तर …

Read More »

27 जून रोजीच्या मोर्चासंदर्भात पोलीस कमिशनर यांच्याशी समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा

बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी नागरिकांना त्यांच्या भाषेत कागदपत्रे व इतर साहित्य मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारने 31 मार्च 2004 रोजी परिपत्रकही काढले आहे. परंतु काही कन्नड संघटनांच्या विरोधामुळे हे परिपत्रक मागे घेतले आहे. परिपत्रकात काही दुरुस्ती करण्याचे कारण देऊन मागे घेतलेले हे परिपत्रक अजून प्रसिद्धीस दिले …

Read More »

जीवन विद्या मिशनतर्फे उद्या वैभव निंबाळकर यांचे व्याख्यान

बेळगाव : सदगुरू श्री वामनराव पै यांच्या संकल्पाचा एक भाग म्हणून जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे उद्या शुक्रवार दि. 17 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचा मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंग मंदिरामध्ये सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात …

Read More »

महिला विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

बेळगाव : ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली हयात घालवली आणि हजारो विद्यार्थ्यांना घडविले त्या प्रभाताई देशपांडे यांनी सुरू केलेल्या शाळेचा आता वटवृक्ष झाला असून त्यांच्या स्मरणार्थ महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे नामकरण ‘प्रभाताई देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल’ असे करण्याचा निर्णय महिला विद्यालय शाळा समितिने घेतला आहे. प्रभादेवी देशपांडे यांचा जन्म 18 …

Read More »

मेजर सुरजीत सिंग एच. यांची माहिती देणाऱ्यास 50 हजाराचे बक्षीस

बेळगाव : बेळगाव शहरामधून गुढरित्या बेपत्ता झालेले कमांडो विंगचे सुभेदार मेजर सुरजीत सिंग एच. यांचा चार दिवस झाले तरी अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलिसांच्या विशेष तपास पथकासह लष्करी अधिकारी व जवानांनी कसून शोध घेऊन देखील सुरजित सिंग यांचा शोध लागत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय …

Read More »

बेळगावात मुस्लिम जिहादविरोधात विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

बेळगाव : देशात मुस्लिम जिहादींकडून हिंसाचार माजवून हिंदूंवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करून, विहिंप, बजरंग दलाच्या वतीने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. श्रीराम नवमीच्या मिरवणुकीवेळी देशभरातील १०० हुन अधिक ठिकाणी मुस्लिम जिहादींनी हल्ला चढवून दगडफेक करून हिंसाचार माजविला आहे. मुस्लिम धर्माचा अवमान केल्याच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील खुल्या जागेचा होणार सदुपयोग

बेळगाव : बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील खुल्या जागेत निदर्शन स्थळ, पार्किंग आणि खाऊ कट्टा उभारण्याची योजना असून, या संदर्भात आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी डीसीपी रवींद्र गडादी यांच्यासमवेत या परिसराची पाहणी करून चर्चा केली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बरीच जागा खुली आहे. परंतु तरीही कार्यालय आवारात पार्किंगची समस्या उदभवत आहे. …

Read More »

दुचाकी चालकाचा गटारीत पडून जागीच मृत्यू

बेळगाव : गटारात पडून एका दुचाकी वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. माधवपूर वडगाव येथील दत्तगल्ली येथे दत्त मंदिर जवळ आज सकाळी ही घटना घडली आहे. हा युवक हा वडगाव चावडी गल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तो युवक अविवाहित असून त्याच्या तीन बहिणीचा विवाह झाल्याचे सांगण्यात …

Read More »

वैवाहिक जीवनात तडजोड केल्यास घटस्फोटाला आळा बसेल : शिवराज पाटील

बेळगांव : वैवाहिक जीवनात तडजोड केल्यास वाढत्या घटस्फोटाला आळा बसेल, असे प्रतिपादन मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत झालेल्या विधवा, विधूर व घटस्फोटितांच्या वधू- वर मेळाव्यात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर, …

Read More »

कंग्राळी खुर्द येथील पाटील कुटुंबियांनी फडकविला केदारनाथ येथे भगवा!

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील श्रीनाथ पाटील आणि विजय पाटील हे कुटुंबिय केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे गेले असता. पाटील कुटुंबियांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज फडकाविला आणि केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक घातला. यावेळी पाटील कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Read More »