Thursday , September 19 2024
Breaking News

LOCAL NEWS

150 वर्षे पूर्ण झालेल्या मत्तीकोप विहिरीचे होणार पुनर्जीवन….

  बेळगाव : खासबाग येथील टीचर्स कॉलनीमधील मत्तीकोप विहीर ही ब्रिटिशकालीन 150 वर्षे जुनी असुन जिथे संपूर्ण टिळकवाडी, शहापूर आणि खासबाग मधील नागरिक पोहायला शिकले होते, 60 वर्षा पूर्वी या विहिरीकडे दुर्लक्ष झाले आणि कालांतराने ती मुजून गेली व तिचे वैशिष्ट्य गमावले. प्यास फाउंडेशन, ए के पी फेरोकास्ट आणि बेम्को …

Read More »

कृष्णा नदीच्या पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळींनी केली पाहणी

  चिक्कोडी : कुडची शहराजवळील कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक नेते आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र सरकारने कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पात्र पाठवले होते. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने कृष्णा …

Read More »

कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महापालिका व हॅस्कॉमचे दुर्लक्ष

  बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरच्या पाठीमागे असलेल्या कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महानगरपालिकेचे तसेच हॅस्कॉमचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कपिलेश्वर तलावात परिसरातील लहान मुले तसेच तरुण वर्ग नेहमीच पोहण्याचा आनंद लुटत असतात. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बालचमू कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र या …

Read More »

सदाशिवनगर स्मशानभूमी अव्यवस्थेचे आगार

  बेळगाव : बेळगावमधील सदाशिवनगर स्मशानभूमी हि अव्यवस्थेचे आगार बनली असून अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदाशिवगर स्मशानभूमीत सुधारणा करण्यासंदर्भात वृत्त प्रकाशित होत आहे. मात्र केवळ आश्वासने देऊन अद्याप स्मशानभूमीच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या स्मशानभूमीत शेडची सोय करण्यासाठी अनेक महिन्यांपासून …

Read More »

बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या कारला अपघात

  बेंगळुरू : बेंगळुरू विधानसौधासमोर बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या कारचा अपघात झाला असून ते किरकोळ जखमी झाले असल्याचे समजते. आमदार महंतेश कौजलागी यांच्या गाडीला आमदार घरातून येताना दुसऱ्या कारने धडक दिली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कब्बनपार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Read More »

तीन वर्षीय बालिकेची हत्या; आजी-आजोबांचा आरोप

  बेळगाव : काही वर्षांपूर्वी आईचे निधन झाले. त्यानंतर सावत्र आई आणि वडिलांच्या सान्निध्यात वाढलेल्या मुलीचेही निधन झाले आहे. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचा आरोप मृत मुलीच्या आजी-आजोबांनी केला आहे. परकन्नट्टी येथील रायण्णा हंपण्णावर यांचा विवाह कडोली येथील भारती हंपण्णावर या तरुणीशी पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक …

Read More »

राज्यातील सिध्दरामय्या सरकारची वर्षपूर्ती वर्धापनदिनात आचारसंहितेचा अडथळा

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अस्तित्वात येऊन आज (ता. २०) एक वर्ष पूर्ण होईल, परंतु नीती संहितेच्या पार्श्वभूमीवर पहिला वर्धापन दिन सोहळा स्थगित करण्यात आला आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. काँग्रेसचे १३५ आमदार निवडून आले. एक अपक्ष आमदाराने काँग्रेस पक्षाला …

Read More »

अर्थ सहाय्याबद्दल समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार

  बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सीमा प्रदेशातील 865 खेड्यातील नागरिकांना विविध रोगावर उपचार करून घेण्यासाठी मदत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून श्री. सुनील लक्ष्मण कुरणकर आळवण गल्ली शहापूर बेळगाव यांना हृदय रोगावरील उपचारासाठी एक लाख रुपयांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने अर्थसहाय मंजूर करण्यात …

Read More »

प्रज्वल दोषी आढळल्यास कारवाई करा

  देवेगौडा यांनी दिली प्रथमच प्रतिक्रीया; कुटूंबाविरुध्द षड्यंत्र रचल्याचा आरोप बंगळूर : धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी आज प्रथमच मौन सोडले. आपला नातू प्रज्वल जर दोषी आढळला तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आपली कोणतीच हरकत नसल्याचे ते म्हणाले. मात्र आपले …

Read More »

खासदार प्रज्वल रेवण्णा विरुद्ध विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

  बंगळूर : बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप असलेले फरार धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने शनिवारी अटक वॉरंट जारी केले. हसनमधील मालिका लैंगिक शोषण प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या अर्जानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले होते, याची पुष्टी सुप्रसिद्ध सूत्रांनी …

Read More »