Sunday , July 26 2026
Breaking News

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून विसर्जन दिवशी महाप्रसादाची व्यवस्था; बेगडी हिंदुत्ववाद्यांचा रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडून निषेध!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच अनंत चतुर्दशी दिवशी जिल्हा प्रशासनाकडून गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला होता. सदर निर्णय घेताना बेळगाव महापालिकेला विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घालून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध केला. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणोशोत्सव महामंडळाच्यावतीने आज जत्तीमठ देवस्थान येथे तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर हे होते.

बैठकीच्या सुरुवातीला जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेश विसर्जनादिवशी गणेशभक्तांच्या सोयीसाठी बेळगाव शहरातील मुख्य पाच ठिकाणी अल्पोपहाराचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला होता पण बेगडी हिंदुत्ववादी सत्ताधारी भाजप नगरसेवकानी या उपक्रमाला महानगरपालिकेच्या बैठकीत विरोध करून एकप्रकारे गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या. त्या बेगडी हिंदुत्ववादी नगरसेवकांचा आजच्या बैठकीत जाहीर निषेध करून सदर अल्पोपहाराचे नियोजन स्वतः महामंडळ लोकवर्गणीतून करणार असून यासाठी बेळगाव शहर परिसरातील गणेशोत्सव मंडळानी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी केले.

यावेळी शहापूर विभाग गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, अंकुश केसरकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, दत्ता जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, रणजीत चव्हाण पाटील, राजू बिर्जे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बैठकीला सरचिटणीस आनंद आपटेकर, प्रशांत भातकांडे, गणेश दड्डीकर, बळवंत शिंदोळकर, सचिन पाटील, संदीप कामुले, विश्वजीत चौगुले, संजय जाधव यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *