Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणोशोत्सव महामंडळाची आज महत्वाची बैठक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच अनंत चतुर्दशी दिवशी जिल्हा प्रशासनाकडून गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला आहे. सदर निर्णय घेताना बेळगाव महापालिकेला विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध केला. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणोशोत्सव महामंडळाच्यावतीने आज दुपारी 12:30 वाजता जत्तीमठ देवस्थान येथे तात्काळ बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष श्री. रणजीत चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख श्री. विकास कलघटगी, सरचिटणीस प्राचार्य श्री. आनंद आपटेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *