बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी देशभरातील सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही आज आंदोलन करण्यात आले. पेन्शनमध्ये वाढ करावी, वैद्यकीय खर्च द्यावा, आयडीएचा परतावा द्यावा आणि पेन्शनवर संसदीय मंडळाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करावी या चार मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एआयबीडीपी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी बेळगावातील कॅम्पमधील …
Read More »LOCAL NEWS
नेसरगी पोलिसांकडून अन्नभाग्य योजनेचा तांदूळ जप्त
बेळगाव : नेसरगी पोलिसांनी अन्नभाग्य योजनेचा तांदूळ बेकायदेशीरपणे वाहून नेणारी एक गाडी पकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त केला आहे. बोलेरो पिकअप वाहनातून बेकायदेशीर रेशनच्या तांदूळाची वाहतूक होत असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून नेसरगी पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तांदूळ जप्त केला. वाहनासह 76,076 रुपये किमतीचा 71 पोती …
Read More »येळ्ळूर येथील जलजीवन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात
बेळगाव : येळ्ळूर गावामध्ये चालू असलेल्या जलजीवन 24/7 पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येळळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या कामाची कटाक्षाने पाहणी केली. यावेळी झोन 4 आणि 5 मधील रामदेव गल्लीपासून विराट गल्ली येळळूरपर्यंत पाहणी करताना बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही, प्रेशर …
Read More »अन्नधान्यवर लादण्यात आलेल्या जीएसटीचा ‘आप’कडून निषेध
बेळगाव : अन्नधान्यावर लादण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाच्या विरोधार्थ आज बेळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज आम आदमी पार्टीच्या बेळगाव विभागातर्फे आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, दूध, ताक, दही यावर लादण्यात आलेल्या जीएसटीचा निषेध करत सदर निर्णय सरकारने मागे घ्यावा, …
Read More »बिम्स रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बालक दगावल्याचा पालकांचा आरोप बेळगाव : बिम्स रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बिम्स रूग्णालयासमोर डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला. होन्निहाळ गावात राहणार्या सुनीता यांना आठ दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. दरम्यान, कुटुंबीय …
Read More »बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस साजरा
बेळगाव : बेळगाव येथील बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम रामदेव गल्लीतील बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनियर ब्रँच मॅनेजर, ब्रँच मॅनेजर तसेच बँक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुरेश कुरेन्नावर सिनियर ब्रँच मॅनेजर, प्रदीप शिंदे, बाळा बाळतीमल्हा, आनंद सुगटे, सौ. दुर्गा चौगुले, …
Read More »राजकुमार टाकळे यांचा काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर पलटवार
बेळगाव : हिंदू कायद्यानुसार दुसरे लग्न होऊ शकत नाही, मी तिच्याशी लग्न केलेले नाही, असे म्हणत फलोत्पादन खात्याचे अधिकारी राजकुमार टाकळे हे माझे पती आहेत, असा नवा बॉम्ब फोडणार्या काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर राजकुमार टाकळे यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस नेत्या नव्यश्री यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणारे उद्यान विभागाचे अधिकारी …
Read More »पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई द्यावी : शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : लेंडी नाला व बेळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढून नाला पूर्णपणे स्वच्छ करावा तसेच पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लेंडी नाला व बेळ्ळारी नाला वर्षानुवर्षे विकासापासून दुर्लक्षित आहे. अनेकदा मागणी करून देखील या नाल्याची साफसफाई करण्याची तसदी स्थानिक प्रशासनाने घेतलेली नाही. …
Read More »बेळगाव-सांबरा रस्ता होणार सहा किंवा चौपदरी
बेळगाव : रायचूर-बाची राज्य महामार्गावर येणार्या बेळगाव-सांबरा रस्त्यादरम्यान सहा पदरी किंवा चौपदरी रस्ता बांधकामासंदर्भातील योजनेवर स्वतंत्रपणे चर्चा करून तातडीने मंजूर करण्यात येईल, असे जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. कर्नाटक विकास कार्यक्रम अर्थात केडीपीची पहिली तिमाही बैठक आज मंगळवारी सुवर्ण विधान सौध येथे घेण्यात आली. प्रगती आढावा बैठकीच्या …
Read More »दुसऱ्या रेल्वे रुळाशेजारील भिंत कोसळण्याच्या मार्गावर!
बेळगाव : दुसर्या रेल्वेगेटजवळील रेल्वे रुळाशेजारील भिंत कलली असून, ती कधीही कोसळण्याचा मार्गावर आहे. यामुळे या ठिकाणाहून जाणार्या येणार्या नागरिकांना आणि रेल्वेलाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही भिंत सुमारे सहा महिन्यापूर्वीच बांधण्यात आली आहे. दुसर्या रेल्वे गेट टिळकवाडीकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूला रेल्वेचे रेडिमेड कुंपण एका बाजूला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta