Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळल्याने युवक जागीच ठार

  बेळगाव : दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळून युवक जागीच ठार झाल्याची घटना आरटीओ सर्कल पाच नंबर शाळेसमोर मंगळवारी सकाळी घडली आहे. राकेश सुलधाळ (वय 26) रा.सिद्धनहळळी बेळगाव असे या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी आहे की, सदर युवक दुचाकीवरून आरटीओकडून कोर्टकडे जात होता. …

Read More »

साईज्योती सेवा संघाच्या सहकार्यामुळे महिला सुखरूप घरी पोहोचविण्यास मदत

  बेळगाव (वार्ता) : साईज्योती सेवा संघाच्या सहकार्यामुळे निपाणी येथील संतुलन बिघडलेली एक महिला सुखरूप आपल्या घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, काल रात्री सुमारे 8.30 वाजता राणे साखरवाडी निपाणी येथील कमलाबाई शिंदे नामक आजी टिळकवाडी दुसरा रेल्वे गेट जवळ आढळून आल्या असता साईज्योती सेवा संघाच्या …

Read More »

उद्यमबाग पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक; तीन दुचाकी जप्त

  बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. विशाल महादेव मक्कळगेरी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून चोरलेल्या एक हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा स्प्लेंडर आणि बजाज सिटी 100 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उद्यमबाग पोलिस स्थानकाचे निरीक्षक रामण्णा …

Read More »

वाहतूक कोंडीत अडकली कार; डॉक्टर ४५ मिनिटे धावले; सर्जरी करून रुग्णाला दिले जीवनदान!

  बंगळुरू (संतोषकुमार कामत) : रुग्णासाठी डॉक्टर देव असतात. डॉक्टर रुग्णांसाठी सदैव झटतात, रात्रीचा दिवस करतात. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरांनी पळत पळत रुग्णालय गाठलं. गोविंद नंदकुमार असं या डॉक्टराचं नाव आहे. ३० ऑगस्टला नंदकुमार मणिपाल रुग्णालयात जात होते. त्यावेळी रस्त्यात मोठी वाहतूककोंडी होती. वाहतूककोंडी फुटण्याची वाट …

Read More »

पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर

  बेळगाव जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली : 35 घरे कोसळली बेळगाव (प्रतिनिधी) : सीमाभागातील बेळगाव जिल्हा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परिणामी बेळगाव तालुका, शहर परिसर आणि जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार सुरूअसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली गेले असून 36 …

Read More »

संगीत शिक्षिका निवेदिता नवलगुंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बेळगाव : निवेदार्पण अकादमी ऑफ म्युझिकच्या संचालिका निवेदिता नवलगुंद यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 49 वर्षांच्या होत्या. सोमवारी पहाटे 1.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. बेळगावातील चन्नम्मा नगर येथे गेल्या काही वर्षांपासून त्या संगीत अकादमी चालवत होत्या. …

Read More »

भारत नगर, शहापूर येथील इमारतीचा जीर्ण भाग कोसळला

  बेळगाव : भारत नगर, शहापूर येथील बाजार रोड (मुख्य रस्ता) वरील धोकादायक अवस्थेत असलेल्या कदम चाळेचा उत्तरेकडील भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, जीर्ण इमारतीचा कोसळलेला भाग नजिकच्या अनिल पाटील त्यांच्या घरावर पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. शिवाय पान टपरीचेही पत्रे फुटून नुकसान झाले. पाटील कुटुंबातील महेश …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून

  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळी ठरण्याची शक्यता बंगळूर : उद्यापासून (ता. १२) सुरू होणारे विधिमंडळाचे दहा दिवसांचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी भ्रष्टाचारासह कथित घोटाळे, पाऊस आणि पायाभूत सुविधांच्या समस्या यासारख्या अनेक मुद्द्यांवर बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. २३ सप्टेंबरपर्यंत चालणारे हे …

Read More »

हुलीकट्टी येथे भिंत कोसळून महिला ठार

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली. हुलीकट्टी गावातील गंगव्वा रामण्णा मुलीमनी यांचा जोरदार पावसामुळे घर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आज, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी घरात झोपलेल्या गंगव्वा गंभीर जखमी झाल्या. …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाची हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुगळीहाळ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला आहे. अर्जुन गौड (21) असे चाकूने वार केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात हाणामारी झाली, यादरम्यान एका व्यक्तीने अर्जुन गौड याच्या छातीत वार करण्यात आले …

Read More »