बेळगाव : बेळगाव रेल्वे पोलीस ठाणे, बेळगाव रेल्वे उप ठाणे आणि रेल्वे सुरक्षा दल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
मादक पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, मादक पदार्थ सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती देणारी पत्रके रेल्वे प्रवाशांमध्ये वितरीत केली. तसेच रेल्वे डब्यांमध्ये मादक पदार्थ सेवन विरोधातील भित्तीपत्रके चिकटविली.
बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्याचे फौजदार शिवानंद आरेनाड यासह अन्य मान्यवर आणि पोलीस कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.