शहापूर विभाग मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बैठक संपन्न
बेळगाव : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकातील श्रीसाई गणेश सोसायटीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते.
मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवावर विविध बंधने घालण्यात आली होती.
त्यामुळे मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती मूर्तीशाळेतच राहिल्या आहेत , त्यासाठी त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा गणेश उत्सव कोरोना चे नियम पाळून साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात यावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली .
प्रत्येक गणेश मंडळाने बंदिस्त प्रकारचे देखावे सादर करू नयेत खुल्या स्वरूपाचे देखावे सादर करावेत त्यामुळे कोरोना चे नियम पाळणे सोपे होईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीत माजी नगरसेवक राजू बिर्जे, शिवसेना उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, रणजीत हावळणाचे, नितीन जाधव, तानाजी शिंदे, पी. जे. घाडी, माजी नगरसेवक रमेश सोनटक्की, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम आदी मान्यवरांनी विचार मांडले.
बैठकीला शांताराम खटावकर, गजानन सुतार, रोहित भाकोजी, रोशन शिंदे, दिलीप दळवी, अर्जुन देमट्टी, सुधीर कालकुंद्रीकर, राजाराम सूर्यवंशी, हिरालाल चव्हाण, रवींद्र जाधव, राजेश पाटील, महादेव पाटील, प्रसाद चव्हाण सचिन केळवेकर, सुरज कडोलकर, मंजुनाथ भोजनावर, रवींद्र शिगेहळ्ळीकर यासह अन्य गणेशभक्त उपस्थित होते.
मंगळवार दिनांक 6 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी वरील संदर्भात चर्चा करण्याचे आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरले.
अध्यक्ष नेताजी जाधव यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष अशोक चिंडक यांनी आभार मानले.